खरं तर आता मी जे येथे मांडणार आहे ते एका लेखात मावणं अशक्यच आहे, पण मी प्रयन्त करणार आहे. आज मी अनेक महिन्यांनी किंबहुना एका वर्षा नंतर एक समारंभ अटेंड करायला गेले. माझ्या गुरु "डॉ. गौरी जोशी" ह्यांच्या पहिल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहोळा होता. पुस्तकाचं शिर्षक आहे "ट्रंककॉल टू कृष्णा". प्रकाशन करण्यास उपस्थित होते पुण्याचे मेयर साहेब, डॉ. नितीश भारद्वाज, डॉ. मोहन आगाशे, मा. लक्ष्मीकांत देशमुख आणि पुस्तकाचे प्रकाशक. ह्या सगळ्या दिग्गजांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि त्यानंतर सगळ्यांनी आप-आपले मनोगत व्यक्त केलं अगदी थोडक्यात पण साजेसं. संपूर्ण अनुभव मंत्रमुग्ध करणारा होता, इतका कि असं वाटलं रुपेरी पडद्यावरचा नाही तर प्रत्यक्ष श्री. कृष्ण आणि सुदामा आले आहेत आशीर्वाद द्यायला. सर्वांना प्रत्यक्ष बघता, ऐकता आणि अनुभवता आलं, माझं भाग्यच...
मी माझ्या सवयीप्रमाणे वेळे आधी पोचले कार्यक्रम स्थळी आणि काय प्रचंड तय्यारी केली होती गौरी मॅडम नी, इतकं व्यवस्थित प्लांनिंग मी कधीच कुठेच कधीच नाही अनुभवलं, अहाहा. अगदी शिस्तीत काटेकोर पणे न विसरता प्रत्येक गोष्टीची अगदी बारकाईने केलेली तय्यारी. धन्य आहेत खरंच. आणि मंडळी फक्त त्या कार्यक्रमाच्या स्थळी नाही बरं का, पण जे असंख्य शिष्य ऑनलाईन लाईव्ह अटेंड करत होते त्यांच्या साठी सुद्धा सगळी जय्यत तय्यारी होती.
ज्यांनी शारदा स्तवन म्हणून कार्यक्रमाची सुरवात केली ते एक प्रसिद्ध संगणक तज्ञ, त्यानंतर गाण्याच्या आवडीमुळे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं संगीतात, आपली एक संस्था सुरु केली आणि असंख्य कार्यक्रम पण करतात, रचना करतात आणि बरेच काही.
श्री. कृष्णा वर आधारित पुस्तक असल्यामुळे काही गीतेचे श्लोक सादर केले एका काकूंनी ज्यांना संपूर्ण गीता मुखोद्गत आहे. गेली अनेक वर्षे त्या गीतेचे विवेचन करतात, शिकवतात आणि बरेच काही. त्यांना अनेकविध पुरस्कार पण मिळाले आहेत.
प्रत्येक मान्यवरांना भेट म्हणून एक छोटी वस्तू आणि एक मोठं पेन्टिंग दिलं गेलं जे एका मॅडम नी काढलं होत, अप्रतिम हा शब्द फारच छोटा आहे त्यांच्या कलेची वाह वाह करण्यासाठी.
प्रत्येक उपस्थित पाहुण्यांसाठी एक मास्क देण्यात आला. जो एका गरजू महिले कडून खास तय्यार करून घेतला होता, आणि तो मोरपंखी रंगाचा होता.
"सुदाम्याचे पोहे" नसतील असं शक्यच नाही. अनेक वर्षांनी "काला" खाण्याचा योग आला.
ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात आलं होत. प्रत्येकाला एक खुर्ची सोडूनच बसण्याचा आग्रह होता आणि सगळ्यांनी तो शिस्तीत पाळला देखील. व्यासपीठावरची सजावट ते प्रत्येक येणाऱ्यांची नोंदणी, पुस्तक विक्री आणि त्यासाठी लागणारी चिल्लर (सुट्टे पैसे / नोटा), प्रकाशन होता क्षणी प्रत्येक उपस्थिताला वाटण्यात आलेले आकर्षक कागदात गुंडाळलेले चॉकलेट्स... काय लिहू आणि काय नाही असं झालाय मला.
शनिवार, १३ मार्च, २०२१
एक अभूतपूर्व अनुभव...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा