माझा लेक एखाद्या वर्षाचा असेल कदाचित, जेव्हा ते "पुक-पुक" वाजणारे बूट, इलॅस्टिक लावलेल्या छोट्याश्या स्लीपर्स / सपाता मी विकत घेतल्या. त्याची गोरे गोबरे पावलं आणि छूटकुल्या सपाता, त्यात त्याला समजावणं कि कसे पाय घालायचे, मग न पडता चालायला शिकवणे थोडासा आधार देऊन वगैरे जेव्हा चालू होत तेव्हा कधीच त्याने दोन्ही पावलं योग्य अश्या चपलेत घातलेच नाही, डावा पाय उजव्या चपलेत आणि ...
हे राम.
माझ्या संयमाची / चिकाटीची परीक्षाच जणू रोज असायची.
"आपेआपे" हा एक फंडा होताच, म्हणजे काही दिवसांनी सुरु झालं "माझं मला चपला घालता येत, तू नक्को सांगू मला...", असं काहीसं.
असे उलटे-पुलटे घातल्यामुळे (डाव्या पायात उजवी चप्पल आणि उजव्यात डावा.... ) मग जोरदार पडायचा, मग रडणं, हे राम.
आज मला हे सगळं का आठवलं म्हणताय मंडळी?
सांगते न.
माझ्या मावशीने पोछा मारला आणि बाथरूम समोर माझ्या सपाता अश्या उलट्या मांडून ठेवल्या चुकून असेल कदाचित, पण फार छान झालं, ते बघता क्षणी मला हे छोटेखानी लिहिता आलं, आणि १७ वर्षांपूर्वी झालेले प्रसंग आठवून, लेकाला सांगून प्रचंड मोठा आनंद / परमानंद उपभोगता आला.
त्यामुळे मावशींना आणि त्यांच्या न कळत घडलेल्या कृतीला सलाम आणि धन्यवाद.
For more such stories kindly find me also at Facebook:
www.facebook.com/preeti.mulay and https://youtu.be/cyOCv3Z8Q_Q
Watch video of this Anukatha on:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा