आज रविवार, सुट्टीचा दिवस आणि म्हणजेच विविध पदार्थांची पर्वणी च जणू. त्यात आज आम्हा मुलांना "वन डिश मील" हवं होत, स्वयंपाक त्यामुळे कमी होता आणि मग काय सोडते का मी, ताबडतोब वेळखाऊ शेंगोळे तय्यार केले.
शेंगोळे (गोड) हे माझ्या आई-बाबांकडे गणपती च्या नेवेद्याला वर्षातून फक्त एकदा करत असत, गणपती उठायच्या दिवशी. त्याही मुळे असेल कदाचित, मला भयानक च आवडतात शेंगोळे, कारण रेअरली होत असतं त्यामुळे. असो. माझी हि आवड मी माझ्या घरी पण जपली आणि माझी मुलं देखील ह्या शेंगोळ्यांची माझ्या पेक्षा मोठी फॅन आहेत, सतत माझ्या मागे लागतात कर म्हणून. आज मुहूर्त लागला, केले आणि फस्त झाले बघता बघता एका मिनिटात.
तेव्हा वेद म्हणतो कसा "मम्मा तुला आठवत का ग, एकदा आमच्या शाळेत सगळ्यांना तुमच्या गावाकडचे / कुटुंबातले रेअर गोड पदार्थ करून आणायला सांगितले होते, आणि तू आम्हाला शेंगोळे आणि वार्णिकाला प्रचंड आवडत म्हणून कलाकंद करून दिला होता. हे दोन्ही पदार्थ सगळ्यांना थोडे थोडे चव म्हणून येतील असे द्यायचे होते, आणि तू गोड चिकट हाताला लागू नये म्हणून "श्री. सत्यनारायण" प्रसादाला वापरतात त्या छोटेखानी कागदाच्या वाट्या पण सोबत दिल्या होत्या, बाप रे, सकाळी उठून कधी केलंस सगळं?" ई. मी तर विसरले होते हे सगळे पण वेदनी आठवण करून दिल्यावर आलंच डोळ्यात पाणी थेंब भर आणि फारच भन्नाट वाटलं. कारण असं कि वेद पुढे म्हणाला कि मम्मा आम्ही दोघांनी आणि अजून एखाद्या मित्रांनी गुलाबजामून करून आणले होते बास, बाकी सगळ्यांनी विकतचंच आणलं होत. कोणालाही शेंगोळे माहित नव्हतं, आम्ही खूप प्रयन्तपूर्वक समजावून सांगितलं, इव्हन टिचर ना पण माहित नव्हतं. काहीतरी पेरलं आहे मी थोडंस ह्याची खात्री झाली आणि आता पुन्हा जेव्हा जेव्हा मी शेंगोळे हा शब्द वापरणार तेव्हा तेव्हा मला आता हे आठवणार च.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा