सोमवार, ३ मे, २०२१

तरारून आलेले मोड...

उद्याचं  किंवा पुढचं प्लांनिंग करणं आणि करत राहणं हा मनुष्य धर्मच आहे, मग ते पैश्याचं, गुंतवणुकीचं, स्वयंपाकाचं आणि तर निवृत्तीचं असो, विचार आणि कृती करत राहावी लागते. अर्थात मी काही वेगळी नाही, त्यामुळे काल रविवार, म्हटलं जरा आज मटकीची उसळ करावी, म्हणून सकाळी ती  भिजत घातली, संध्याकाळी घट्ट बांधून झाकून ठेवली आणि आज बघते तर काय तरारून मोड आलेले, "ना भूतो ना भविष्यती" असेच. सर्वप्रथम ते बघूनच प्रचंड आनंद झाला मला. मग ते मी स्वच्छ निवडले, मस्त फोडणीला घातले आणि थोडेसे च परतल्यावर मसाले घालून मग फस्त पण केले गरम गरम चव म्हणून. अहाहा काय दिवस सुरु झालाय म्हणून सांगते. उसळ फोडणी घालतांना सहज ध्यानात आलं कि अनेकदा मिसळ मधे जी मटकी घातली असते त्याला मोड आलेले नसतात,किंवा काही जणांकडे भिजलेली मटकीच फक्त शिजवतात, मग मोड येण्याची फेज आवश्यक आहे का? 

हे समजावून घेण्यासाठी मग थेट प्रोफेसर राधिका ह्यांना टेक्स्ट केलं, त्यांचा पट्टाकिनी फोन आला आणि त्यांनी काही मिनिटात आणि अतिशयच सोप्प्या भाषेत मला सगळी "लाईफ सायकल" मटकीची + प्रथिनांची + जीवनसत्त्वे ई. समजावली. मला हे सगळं गुगल-बाबा ला पण विचारता आलं असतं पण त्याने इतकं सोप्पं आणि सर्वगुणसंपन्न चौफेर उत्तर दिल नसत एका झटक्यात / एका वेबसाइट वर आणि माझा स्क्रीन टाइम वाढला असता ते वेगळंच. ह्या निमित्याने माझं थोडावेळ बोलणं झालं मॅडमशी.  

कुठल्याही पद्धतीने आणि स्थिती मधे मटकी सेवन केली तर त्याचे थोडे फार गुण मिळतात आपल्या शरीराला पण जर बेस्ट परिणाम साधायचे असतील तर भिजवणे अतिशय आवश्यक डायरेक्ट शिजवणे टाळावे, मोड आलेले थोडेसे शिजवून खाल्ले तर "सोन्याहून पिवळे". 

अगदी तस्सेच माणसाचे देखील असते नाही, सगळीच माणसं आहेत तशी उपयोगी असतातच पण जर आपण स्वतःला उत्तम संगतीत भिजवलं, आवडतील ते छंद जोपासत राहिले, उत्साहाचे मोड आणले म्हणजे मग त्या व्यक्तिमत्वाला सोन्याची झळाळी येतेच / येणारच, व्हिटामिन-सी भरपूर मिळणार नाती घट्ट होणार अजून. वय, व्यवसाय, वर्ण, ई. अनेक गोष्टी चा फरक पडत नाहीच मग, "जेथे जाल तेथे चमकाल" कारण सगळे लागणारे जिन्नस (प्रथिने, जीवनसत्वे ई)तुमच्या पेर्सोनॅलिटी मधे झळकत असतातच. "तरारून आलेल्या मटकीच्या" मोडांसारखे बहुउपयोगी राहा मित्रहो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...