रविवार, १६ मे, २०२१

वेळेची परतफेड (भाग २१)

आमच्या सिंबायोसिसचं एक अती भव्य दिव्य असं अत्याधुनिक रुग्णालय सुरु झालं आहे गेली दोन वर्षे. तसं  दोन तीन दा काही कामानिमित्य तेथे जाण झालं होत. पण काल आणि आज माझ्या एका पायाची चिकित्सा करायला गेले होते. त्यामुळे बराच वेळ घालवता आला आणि खूप काही दृष्टीस पडलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढ्यातच माझी एक नवीन विद्यार्थिनी दाखल झाली आहे आणि तिच्याकडे चारचाकी आहे जी ती फारच उत्कृष्ट चालवते. मी बसली आहे तिच्या सोबत बरेचदा. ह्या दोन्ही दिवशी पूर्ण वेळ ती माझ्या बरोबर होती, संपूर्ण रुग्णालयात धावपळ तिनेच केली, सगळी कागदपत्र व्यवस्थित तयार करून आणली. दोन दिवस सलग जवळपास तास माझ्या करता देणं हे ह्या जगा वेगळंच आणि तेही कुठल्याही बगीचा किंवा मॉल सारख्या देखण्या जागेत नाही, इस्पितळात. फारच आभारी आहे मी माझ्या विदार्थीनीची. इतका संयम कुठून आला तिच्यात कोणास ठाऊक. ह्या सगळ्याची परतफेड कशी करू मी कोणास ठाऊक? तिच्या ह्या सगळ्या कष्टाचं फळ म्हणजे माझा अहवाल अगदी चांगला आला आहे, आणि अशा करते कि पाय हि लवकरच पूर्णतः बरे होतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...