प्रत्येक वर्षी न चुकता मी श्रावण महिन्याची वाट बघायची लहानपणी, शाळेत असतांना. का कुणास ठाऊक पण सकाळी सकाळी शाळेत जाण्याआधी आई पुराणांच्या दिव्याने ओवाळायची ते मला फार आवडायचं. अर्थात सभोवती बहुतेक सगळ्यांकडेच असे वातावरण होते तेव्हा. अजूनही जेव्हा मी आईकडे असते श्रावण शुक्रवारी तेव्हा सुद्धा ती मला ओवाळते, मी एवढी मोठी झाले तरी, अर्थात तिच्या करता मी अजूनही लहानच आहे.
जिवती म्हणजे लहान मुलांची देवी, तिची श्रावण शुक्रवारी पूजा करतात, आणि
मुलांना उदंड आयुष्य लाभो अशी
प्रार्थना करतात. त्यानंतर संध्याकाळी सवाष्णी हळदीकुंकूवाला येतात आणि
गूळ-फुटाणे + मसाला दूध
ई. दिले जातें सर्वांना. असे
४ किंवा ५ शुक्रवार करण्याची प्रथा आहे. मीही आई झाल्यावर मुलांसाठी हे सुरु ठेवलंय अजून पर्यंत. संध्याकाळी जमेल तेवढ्या सवाष्णींना विष्णुसहस्त्र नाम म्हणण्यास बोलावते आणि गूळ-फुटाणे प्रसाद देते.
का कुणास ठाऊक पण माझ्या मुलांना माझ्या एवढी उत्सुकता नाही आहे ह्या सगळ्या बाबतीत. अर्थात कदाचित नोकरी करणारी आई असल्यामुळे मला धार्मिक वातावरण निर्माण करता नाही आलं. असो.
इतक्यातच एक लेख वाचनात आला. त्यात असं सिद्ध केलं होत कि "उदंड औक्षवंत हो...." असं जे म्हटलं जातं ओवाळतांना त्यामुळे काही विशिष्ट ध्वनी लहरी तयार होतात ज्या वाढत्या वयातील मुलांना फारच उपयोगी असतात. छान वाटलं वाचून.
रविवार, ३० मे, २०२१
श्रावण शुक्रवार...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा