रविवार, ३० मे, २०२१

One of my rarest gifts

 पत्ते....

माझी एक संशोधन करणारी विद्यार्थिनी इतक्यातच अमेरिकेला जाऊन आली. तिथे मायक्रोसॉफ्ट कंपनींत एक मोठा समारंभ होता, म्हणून गेली होती. तिथे गेल्यावर तिला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामध्ये एक म्हणजे सगळ्या आलेल्या मंडळींना मायक्रोसॉफ्ट ने एक एक पत्त्यांचा कॅट भेट म्हणून दिला. तिने भारतात परत आल्यावर मला तो दाखवला. त्यात प्रत्येक जण जे समारंभात भाग घेणार होते त्यांच्या नावाचा कमीत कमी एक पत्ता होता, काही दिग्गजांचे एका पेक्षा जास्तही पत्ते होते. अगदी विचारपूर्वक ते पत्ते तयार केले होते. मला माझी विद्यार्थिनी हे समजावून सांगत असतांना तेथे माझी वार्णिका पण बसली होती. आम्हाला हि संकल्पना फारच भावली.

माझ्या वाढदिवसाला वार्णिकाला काही तरी वेगळं द्यायचं होत. ती जेव्हा संगणकावर शोधत होती त्यावेळी तिला नाविन्यपूर्ण पत्ते आढळले कि ज्यात प्रत्येक रंगा प्रमाणे आणि चिन्हा प्रमाणे ५२ कारणे दिले होती आईबद्दल, कि ती मला का आवडते. झालं, मॅडम ना भारीच आवडलं ती भेट म्हणून. जेव्हा मला तिने तो पत्त्यांचा कॅट दिला तेव्हा म्हणते कशी मायक्रोसॉफ्ट चा प्रभाव आहे बरं का, मला हि गोष्ट बघता क्षणीच आवडली आणि म्हणून मी खास तुझ्या साठी घेतली. खूप विचारपूर्वक तय्यार केलाय प्रत्येक पत्ता, जोकर पण आहे. मागच्या बाजूला प्रेम ह्या शब्दांचा ढग (word-cloud) आहे. खूप गोड संकल्पना.

जुनी म्हणं आहे ना "असे पाहुणे येति आणिक स्मुर्ती ठेवुनी जाती"....
तस्संच "अश्या भेटी मिळती आणिक स्मुर्ती ठेवुनी जाती"......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...