रविवार, ३० मे, २०२१

Festive time

आताशा मी विश्वविद्यालयात जात असल्यामुळे जवळपास रोजच काही ना काही कार्यक्रम चालूच असतो, बघायला मिळतो. एक दिवस मी पोचते तो काय दिसलं मला, कि सगळ्या जिन्याच्या पायऱ्या सुशोभित केल्या आहेत फुलांनी. बरेचसे तरुण तरुणी मराठमोळ्या वेशात आहेत, लुगडं, पगडी, धोती, कुर्ता, काय विचारू नका. गाणे वाजवण्याची व्यवस्था होती. सही करायला गेले तर शकूनी मामा झालेला असा एक दिसला, जोकर पण होता शेजारी आणि असे अनेकविध नटलेले चेहेरे होते पसरलेले. कोणी त्यांच्या चेहेऱ्याची रंग रंगोटी करत होते, तर कोणी छायाचित्र काढत होते, एकंदरीत प्रचंड धमाल सुरु होती. मी सगळं टाकून / बाजूला सारून मनापासून सगळ्याचा आनंद घेत होते तोच बघते काय, सगळ्या लुगडं नेसलेल्या अचानक नृत करायला लागल्या, "कहो ना प्यार है..." ह्या गाण्यावर. देवा.

तर त्या दिवशी गोदरेज कंपनीचे मोठे साहेब लोक येणार होते कार्यक्रमाला म्हणून हि जय्यत तयारी होती म्हणे. ठरल्याप्रमाणे आले कंपनीचे लोक, त्यांचं आधी लावणी तत्सम गाण्यां वर नाचून स्वागत झालं, मग पंजाबी झालं, मग ते लोक चार पावलं पुढं आले तर जोकर करतब करत पुढे आला, थोडं पुढे येतात तोच शकुनी आला, मग एका विद्यार्थ्याने गिटार वर बोटांची जादू फिरवली आणि भलतीच मज्जा आली. इतकं मस्त आयोजन केलं होत सगळ्या जणांनी कि "ज्याचं नाव ते"... फारच आवडलं मला. ह्याला म्हणतात जंगी स्वागत ... अहाहा...

Wrote on FB timeline on 2nd Aug 2019.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...