रविवारी माझा वृत्तपत्र विक्रेता मला महिन्याचे पैसे मी कसे कमी दिले हे पोट तिडकीने समजावून सांगत होता. मी नेहेमीच त्याला संगणका मार्फत पैसे देते आणि ते कधीच कमी नव्हते आज पर्यंत. मग मी हि खोलात जाऊन विचारलं, माझा हिशोब सांगितला, तर म्हणतो कसा कि १५/- म्हणे वृत्तपत्र टाकण्याचे पैसे. अजिबच वाटलं मला. वृत्तपत्र संस्था त्यांना त्यांचं मानधन देतातच, आणि त्यावर हे लोक प्रत्येक घरटी पैसे गोळा करतात म्हणजे आवडलं नाही मला. अर्थात मी रोज वर्तमानपत्र वाचत देखील नाही, आवड आहे भरपूर पण सकाळी अजिबातच वेळ काढता येत नाही. आणि सकाळच्या गडबडीत बाहेर पडून रोज स्वतः विकत आणणे हि मला शक्य नाही आणि बाकी घरी कोणी इतके उत्साही नाही. ह्याचा बरोबर फायदा घेतात. अर्थात १५/- जास्त नाहीत मुळी, पण का? जाऊ दे...
Wrote this on my FB timeline on 9th Aug 2019. And today the newspaper guy charges Rs.50/-.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा