रविवार, १६ मे, २०२१

"आभासी वारी" / "Virtual Wari"

काही आठवड्या पूर्वी ह्या "नवीन-सामान्य" दिवसात मला लक्षात आलं, वाचनात आलं कि ह्या वर्षी कित्येक वर्षाची "श्री. पंढरपूर वारी" च्या परंपरेत खंड पडणार. शिवाय ज्यांना रोजच्या व्यायामाची सवय आहे, बाहेर पडण्याची सवय आहे त्यात हि मोठा बदल घडला आहे. माझ्या सारखे जे वारी करत नाहीत आणि बाकी सगळ्या साठीच विचार केला कि का नाही घरीच, सोसायटी मधे, गल्लीत आणि जमेल तसं चालावं, कारण चालणं अतिशयच महत्वाचे आहे, हलका व्यायाम देखील होणं महत्त्वाचाच आहे. पण वारी आणि व्यायाम ह्याची जोड देण्या करता एक विचार लक्षात आला तो "आभासी वारी" चा. ह्यात चालायचं, व्यायाम करायचा पण तो "श्री. विठ्ठलाचे" / "श्री. ज्ञानेश्वर माउली" चे नाव घेतच. मग त्यात तुम्ही फक्त नाव घ्या, भजन म्हणा / ऐका, . म्हणजे वारीलाच चालत आहोत असा आभास होईल. हे करण्याचं मी आवाहन केलं माझ्या संघाच्या सदस्यांना आणि त्यांनी भाग घेतला देखील. अर्थातच मी हि मनापासून हे सगळं केलंच. पण शेवटी शेवटी एक नवीन अनुभव आला, किंबहुना वेगळीच जाणीव झाली आणि ती इतकी जबरदस्त होती कि मला शब्दात नीट मांडता येणार नाही कदाचित. तर त्याच असं झालं कि अचानक एक दिवस "श्री. विठ्ठलाचे" नाव घेत घेत चालतांना सहज वाटलं कि माझ्या हातात चिपळ्या आहेत आणि त्या दिवशी मी "टाळ बोले चिपळीला" हे भजन ऐकलं / म्हटलं देखील. मग काय संपूर्ण वेळ मी चिपळ्या वाजवते आहे अशी हातांची, बोटांची क्रिया केली आणि अक्षरश: अनोखा अनुभव आला. मला हे हि आठवलं कि बरेच योग-गुरु पण सांगतात कि मूठ बंद-चालू हा व्यायाम सगळ्या नसा मोकळ्या करण्या साठी कित्ती बहू उपयोगी आहे ते. मला प्रचिती आली आणि ह्या नवीन क्रियेची भर दिल्यामुळे चालणं अजूनच सुकर, सुमंगल आणि आनंदी झालं. माझी सगळ्यांना त्यामुळे विनंती आहे कि प्रयोग म्हणून काही दिवस सलग हे करून बघा, चातुर्मासाचा प्रयोग म्हणून चालणं आणि स्तोत्र / भजन / त्याच नाव घेणं चालूच ठेवा चिपळीच्या तालावर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...