इडली हा पदार्थ ज्यांनी कोणी शोधून काढला त्याला माझा साष्टांग दंडवत. काय आहे नाही हा अफलातून पदार्थ. मला तर इतका आवडतो कि ज्याचं नाव ते. माझे बाबा नेहेमी मला सांगायचे कि प्रवासात किंवा बाहेरच खायची वेळ आलीच तर दोन गोष्टी बिनधास्त घ्याव्या, एक चहा आणि दुसरी इडली. मग अर्थातच त्याच स्पष्टी करणंही द्यायचे ते. म्हणायचे कसे, उकळलेला असतो चहा त्यामुळे शंका न घेता मस्त प्यायचा, तरतरी येते प्रवासात. इडली वाफवलेली असते, हलकी असते त्यामुळे पोटाला थोडा आधार.
मला
आधीपासूनच आईकडे असतांना स्वयंपाकाची विशेष आवड. त्याच सगळ्यात महत्वाचं कारण माझ्या दृष्टीने असं
आहे
कि मला पूर्ण मुभा होती सगळे प्रयोग करायची आणि ते चाखायला संपूर्ण कुटुंब असायचं. किंबहुना प्रत्येक शुक्रवारी माझे वडील आवर्जून विचारायचेच कि ह्या शनिवार रविवार चा काय बेत आहे ते. अगदी वाट बघायचे ह्या दोन दिवसांची ते, कारण बाकी दिवशी कॉलेज असायचं. आणि अर्थातच मी हि वैविध्य पदार्थ खाऊ घातलेच, कारण मलाच विविधता आवडायची / आवडते चवींमध्ये.
कॉलेज च्या दिवसात जेव्हा जेव्हा इडली चा बेत असायचा तेव्हा तेव्हा संपूर्ण दिवस, म्हणजे न्याहारी ला, संघ्याकाळी आणि अधे-मधे येता-जात सहज असंख्य इडल्या खाल्ल्या जायच्या. देवा, काय दिवस होते ते. आणि आता दोन-तीन बास होतात पण आवड कमी झाली नाहीच. त्यात आता माझ्या लेकाची भर पडली आहे. त्याला दिसलं कि मी इडली करते आहे म्हटलं कि मागे लागतो जास्त भिजवं पीठ म्हणून. कशासाठी तर संध्याकाळी त्याचा उपमा करण्यासाठी. त्यालाही अशीच दिवसभर इडली चालतेच. मला अभिमानाने म्हणायला आवडेल कि मला इडली आवडते पेक्षा माझं त्यावर फार प्रेम आहे. अहाहा. उद्याच भिजवते पीठ. या सगळे फस्त करायला आमच्या सोबत. मज्जा येईल.
रविवार, १६ मे, २०२१
आवड आणि प्रेम ...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा