लहानपणी वेद
आवडीने भगर
खात
होता पण काही वर्षांपासून का कुणास ठाऊक अचानक बंदच केली खाणं. किंबहुना कुठलेच पदार्थ ज्यात दाण्याचं कूट आहे ते नकोच म्हणतो. त्यामुळे बरीच वर्ष तो अनभिन्न आहे भगर ह्या पदार्थापासून / चवी पासून. परवा "आषाढी एकादशी" दिवशी ह्यांचं जरा पोट गडबड होत म्हणून म्हटलं काय करावं जे हलकं असेल पोटाला आणि उपवासाला देखील चालेल. मग मी पहिल्यांदा उपवास इडली चा यशस्वी प्रयोग केला. मी आधी "शबरीची बोर" सारखं खाऊन बघितले आणि मग वेद ला आवाज दिला. म्हटलं गरम गरम आहे, खाऊन घे. पहिलाच घास घेतला आणि म्हणतो कसा ह्या भगरीच्या आहेत ना मम्मा? मला थोडंसं आश्चर्यच वाटलं. मुलांचं इतकं लक्ष नसत खरं पण हा पठ्ठा जरा वेगळाच निघाला. अर्थात त्यात दाण्याचं कूट अजिबात नव्हतं, गरम होत्या म्हणून मजेने खाल्या त्याने आणि सगळ्यांनी सुद्धा. मज्जा आली.
लहान असतांना "डब्ब्यात आज काय आहे?" असं मला विचारायचाच तेव्हा जर मी उपवास म्हणून भगर केली असेल तर मी म्हणायची भगर पण त्याच्या चेहेऱ्या वरच तेज आणि उत्सुकता इतकी मोठी असायची आणि उच्य सूरात आनंदाने म्हणायचं "वा, आज बर्गर डब्ब्यात?" कुठे भगर आणि कुठे...
असो
काय
गोड
आठवणी आहेत नाही ह्या सगळ्या, अप्रतिमच. म्हटलं ह्या FB च्या निमित्याने का होईना जपून ठेवाव्यात. नंतर कधीतरी वाचतांना वेगळाच परमानंद मिळेल.
रविवार, १६ मे, २०२१
भगर अक्का बर्गर ...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा