रविवार, १६ मे, २०२१

||श्री काल भैरवाष्टकं||

आमच्या "ब्राह्मण सांस्कृतिक" ह्या संघाच्या एक प्रशासक आहेत शलाका ताई. त्यांनी मला आधी काही महिन्या पूर्वी आणि आता सगळ्याच संघाच्या मंडळींना हे स्तोत्र वाचण्यास सांगितलं. एवढंच सांगून त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी ते संपूर्ण स्तोत्र लिहून पाठवलं आणि शिवाय अप्रतिम ऑडिओ फाईल पण पाठवली श्री. शंकर महादेवन ह्यांच्या सुमधुर भक्तिमय आवाजातली. मी म्हणायला सुरवात केलीच होती आधी पण आता रोजच म्हणावं असं वाटलं, का कुणास ठाऊक. आणि जेव्हा जेव्हा फलश्रुती म्हटली तेव्हा तेव्हा प्रकर्षाने हे लक्षात आले कि शोक, मोह, दैन्य, लोभ, कोप, ताप . चा संपूर्ण नायनाट होतो हे स्तोत्र नियमित म्हटल्यावर. आणि हो ह्याच्या शिवाय श्री. शंकराचार्यांनी विरचित केलेलं हे स्तोत्र ज्ञान आणि मुक्तीचे सोपे साधन आहे, त्या बरोबरच पुण्य पण पदरी पडतच आणि तेचि फार जगावेगळं. इतके महिने फक्त मी हे स्तोत्र म्हणतच होते काही दिवसापासून महत्व लक्षत येतंय. म्हणून इथे लिहावं म्हटलं. संपूर्ण स्तोत्राचा अर्थ पण देत आहे सोबत. जरूर वाचा आणि पठण नियमित होऊ द्या.

http://ioustotra.blogspot.com/2009/05/shri-kalbhairavashtakam.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...