रविवार, १६ मे, २०२१

"प्रयोगातून विज्ञान"...

मागल्या वर्षी पासून मी कुकर मध्ये भात करण पूर्णपणे थांबवलं आहे आणि डायरेक्ट गॅस वरच करते आणि स्टार्च पाणी नंतर टाकून देते भात शिजल्यावर. ह्या - महिन्यांपासून मी जेव्हा स्वयंपाक घराचा पूर्ण ताबा घेतला तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली. आणि हो तेव्हा पुन्हा एकदा प्रचिती झाली कि आम्हाला लहानपणी "प्रयोगातून विज्ञान" हा विषय का होता ते. तर त्याच असं झालं कि आम्हा चौघांसाठी दिवसातून दोनदा भात करतांना आणि तो शिजवताना प्रत्येकी दीड ते दोन लिटर पाणी लागत. माझ्या एक रोल मॉडेल वाहिनी आहेत त्या तांदूळ धुतलेले पाणी, भाजी धुतलेले पाणी . झाडांना घालतात, बागेतल्या. हो पण ह्या पावसाळ्यात झाडांना पाणी एवढं लागत नाही. मग काय? मी जरा धुतलेलं पाणी मोजायचं ठरवलं तर - दा तांदूळ धुतल्यावर साधारणतः दोन ते अडीच लिटर पाणी जमा होत (कधी कधी जास्तच पण कमी नाही), ते हि दिवसातून दोनदा, एका घरात, असे अनेक घरं. म्हटलं तसं तर मी काही फार ह्या सृष्टि साठी करत नाही, तर काही छोटा बदल करता येईल का. सध्या दोन हजार वीस मधे आपण जे चांगल्या दर्जाचे स्वछ तांदूळ विकत घेतो ते धुवायची गरज आहे का? भात तय्यार झाला कि नाही तरी पाणी फेकलंच जात. मग करावा का प्रयोग? बघूया तर काय फरक पडतो चवीत, किंवा अजून काही विशेष. बास, मग काय, "नेकी और पूछ पूछ" केली प्रयोगाला सुरवात आणि काहीच फरक जाणवला नाही मला आणि सगळ्यांना. पण हो, मला थोडसं समाधान मिळालं थोडीशी बचत केली मी पाण्याची आणि करत राहीन. त्यामुळे माझा वेळ हि वाचला थोडासा. पण "थेंबे थेंबे तळे साचे" ना. मग तोच वाचलेला वेळ आणि पाणी काही चांगल्या कामासाठी वापरूयात असं ठरवलं आहे, बघू हा प्रयोग किती सफल होतोय ते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...