यूट्यूब ला आणि विविध पाककृतींना सध्या उधाण आलं आहे. न कळत दुसरं काहीतरी बघत असतांना माझी नजर एका खास विडिओ च्या शीर्षकाकडे गेली. ते तेलगू शब्द इंग्लिश मधे लिहिले होते. आणि मी तर उडालेच ते वाचून, कारण माझ्या दृष्टीने ती पाककृती नव्हती हे एक आणि दुसरं म्हणजे त्यावर विडिओ करण्याची तर खरंच गरज नव्हती. जाऊ दे.
आमच्या लहानपणी एक फार वारंवार खाल्लेला सोप्पा पोटभरीचा पदार्थ म्हणजे "दूध पोहे". सहज पट्टाकिनी तयार होणारा आणि फक्त ३ जिन्नस लागतात जे सहज उपलब्ध असतातच प्रत्येकाकडे, जस कि दूध, जाड पोहे आणि साखर, बास. एक छोट्या वाडग्यात घ्या आणि फस्त करा. सगळ्याच वयोगटासाठी योग्य आणि सगळ्याच वेळेला देखील खाता येतो. मला अजूनही खूप म्हणजे खूपच आवडतो. अर्थात आजकाल मी त्यात थोडे किसमिस, आणि जे उपलब्ध असतील ते ड्राय फ्रुटस घालून खाते. अहाहा. हे लिहिणं झालं रे झालं कि मी खाणारच ताबडतोब.
तर ह्या पदार्थाचा तो विडिओ होता यूट्यूब वर. कमाल आहे का नाही? ह्यात काय शिकवायचं हो? देवा.
तर हे सगळं मी माझ्या लेकीला ऐकवलं, तर ती म्हणते कशी "मम्मा,हे पोहे दूध ई. म्हणजे तुमच्या जमान्यातील सिरिअलच (cereal), नाही का?"
रविवार, १६ मे, २०२१
तुमच्या जमान्यातील सिरिअलच (cereal)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा