गेली अनेक वर्षे मी माझ्या विद्यार्थ्यांचे इंटर्नशिप चे सादरीकरण घेते आणि त्याचं मूल्यमापन हि करते. ह्या वर्षी विद्यार्थी जेव्हा त्यांचं काम सादर करत होते संगणकावर तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती इथे लिहीत आहे. एक नेहेमीचा प्रश्न विचारला जातो विद्यार्थ्यांना कि तुम्ही फक्त हे असंच आणि एवढंच काम का केलंत?. इंटर्नशिप करताना प्रत्येकी सहा महिन्यांचा कालावधी मिळतो. ह्या सहा महिन्यात विद्यार्थी एका कंपनीत जातो जेथे त्याची निवड झाली आहे, पहिले १-२ महिने नवीन काम, विषय, तंत्रज्ञान ई. शिकण्यातच जातात आणि मग काय ते हळू हळू प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते. तसं पाहायला गेलं तर जशी कामाची सुरुवात होते आणि सगळं समजे पर्यंत सहा महिने संपलेले असतात. त्यामुळे बहुतेक सगळ्यांनाच जेवढं दिलंय तेवढंच काम करता येत, जास्तीच किंवा थोडस संशोधनात्मक वगैरे गोष्टी करण जमत नाही.
त्यावरून मला
आमच्या काळचं (मध्यमवर्गीय) सासरी जण आठवलं. सुरवातीचे २-३ महिने तरी (किंबहुना जास्तच) कळतंच नाही काय चाललंय, नवीन लोक, नवीन घर, नवीन अपेक्षा आणि बरंच काही. ह्या विदार्थ्यांचंही काहीस तसंच होत असावं. नाही का?
रविवार, १६ मे, २०२१
मला आढळलेली समानता ...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा