रविवार, १६ मे, २०२१

प्रचलित उच्चार...

मी अनेकदा वर्गात शिकवतांना, हो आजही, काही उच्चार ऐकले आणि थोडेसे ते खटकले. वर्ग घेतानाच असं नाही पण बरेच वेळा इतरांशी बोलतांना देखील हेच शब्द उच्चार ऐकू येतात आणि वेगळं वाटतं कारण ते प्रचलित नाहीत, किंबहुना ते शब्द उच्चारण्याची पद्धत आहे, माझ्या मतानुसार. तर त्याच असं झालं कि मी एक शब्द ऐकते बऱ्याच जणांकडून "डाटा" आणि "डेटा", आहे एकच गोष्ट पण उच्चार महत्वाचे ठरतात, कधी कधी खटकतात पण, कारण डेटा बहू प्रचलित आहे, डाटा थोडासा...

अजून एक प्रकर्षाने ऐकू येणारे वाक्य म्हणजे "मी मिस कॉल मारला",

"
मारला"?

"
मिस कॉल कसा मारतात? आश्चर्यच आहे". "केला / दिला" हे ठीक आहे. माझ्या दोन कानांना जरा ते वेगळं वाटत.

व्हाट्सअँप ह्या शब्दाचं तर बारस इतक्यांदा झालं आहे कि विचारूच नका.

Alumni, Bournbon, color, flower, napotism
हे शब्द तर उच्चारतांना मला देखील अनेक वेळा विचार करावा लागतो, कारण आमच्या गुरुजनां कडून आम्ही जे ऐकलं / शिकलं, किंवा त्या मराठमोळ्या वातावरणात जे ऐकलं / बिंबवलं गेलं तेच वापरलं जात, पण माझे प्रयन्त चालू आहेत आणि सुधारणा दिसते आहे.

phonics=
उच्चार हे एक फार मोठं क्षेत्र आहे आणि ते योग्य होणं फार महत्वाचं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...