रविवार, १६ मे, २०२१

ओळखा पाहू कोण

मला एकदा एक स्पर्धेत भाग घ्यावासा वाटला कारण ते फार अनोखी स्पर्धा होती. त्यात एका नेहेमीच्या वापरातल्या वस्तूच किंवा एंटीटी च वर्णन करायचं होत, कोड्याच्या स्वरूपात...

माझ्या मते एकाच वेळी अनेक अनुभव घेणारा मी आगळावेगळा एकच,
हॉर्नचे सततचे करकर्ष आवाज, सतत घर्षण आणि त्यामुळे निर्माण होणारी उष्णता आणि त्यात थेट सूर्याची किरणे देखील,
सारखं वजन छोट्या मोठ्या अवजड वाहनांच,
माझ्याच खाली सगळं दडवण्याची घाई आणि सवय, त्यात मग पाण्याचे पाईप असोत किंवा विजेच्या तारा,
काळ्या राखाडी रंगाचा असल्यामुळे उष्णता अजूनच साठून राहते,
हे सगळं ह्या महिन्यात अजिबातच नव्हतं, प्रचंड शांतता, घर्षण आणि आवाजच प्रदूषण नाहीच,
कित्येक वर्षांनी किंबहुना पहिल्यांदाच अशी मनः शांती आणि हलकं फुलकं वाटतंय,
कधीतरी छोटे चार पाय मनसोक्त पळायचे अगदी पहिल्यांदाच माझ्यावरून ते मात्र मी फार उपभोगलं,
जगात अनेक भागात माझ्यावर रंगीबेरंगी पानांचा फुलांचा सडाच पडला होता आणि राहिला बराच वेळ / दिवस.

बरोबर ओळखलंत मंडळी = रस्ता  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...