जेव्हा आपण
नदी, नाले, ओढे, आणि
इतर
पाण्याचा प्रवाह बघतो, अनेक दिशांनी नागमोडी धावतांना, पळतांना दिसतो. त्याचा स्वभावच आहे
तो. असं
जरी
असलं तरी
शहरात गगनचुंबी इमारती मधे
हवं
तिथे माणसाला पाणी मिळावं म्हणून कित्येक पाईप लावले जातात, मोटार लावल्या जातात, माणूस / तज्ञ विविध प्रकारे डोकं लावून माणसांना सोया व्हावी म्हणून पाणी पुरवतात. पण ह्या सगळ्या त्रेधा तिरपिटीत त्या पाण्याला किती यातना सहन कराव्या लागतात त्यालाच माहिती. तज्ञ सांगेल तस्स वळायचं गपगुमान, स्वछ होण्या करता अनेक मशिनीतून जायचं, उंची वरून पडायचं म्हणजे त्याच माणसाला वीज मिळावी म्हणून. असो.
ह्या २-३ महिन्यात अनेक आधुनिक संत, महात्मे, आणि बरीच मंडळी सातत्याने विचारत आहेत कि तुम्हाला काही फरक जाणवला का ह्या नवीन जगण्यात, तुम्हाला कोणाला धन्यवाद द्यावेसे वाटतंय का?
मला
मनापासून आज पाण्याला धन्यवाद द्याचेच आहे, आजच नाही तर नेहेमी करता, आणि त्या सर्व जणांना ज्यांच्यामूळे माझ्या अंगणात गंगा आली आहे, पाऊस, वारा, ऊन, धरणं, नद्या, सागर, जलशुद्धीकरण केंद्रातील मंडळी, महानगर पालिका कर्मचारी, नळ कारागीर आणि असे अनेक मंडळी.
रविवार, १६ मे, २०२१
उतार चढाव ...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा