गेला एक दीड महिन्या पासून माझ्या दिनक्रमात अतोनात बदल झाले आहेत. त्यातला एक महत्वाचा बदल म्हणजे रोज एक नारळाचे पाणी घेते, शहाळं. रोज तर मी ह्याची नोंद घेतच होते पण आज काही प्रकर्षाने जाणवलं. रोजच्या शहाळ्याची चवीची कधीच पुनरावृत्ती झाली नाही, खरंच निसर्गाचं आश्चर्यच ते. कधी अतिशयच मधुर, तर कधी साधं चवीचं पाणी तर कधी जरा चव-विरहितही. अनेक आकार, प्रकार आणि रंग छटांचे शहाळे अनुभवले. त्यावरून असं वाटत कि ज्या ठिकाणी हे नारळाचं झाड आहे, तिथली रेती, हवा, पाणी, उंची, वय, कश्या हेतूने लावलेत, कुणी लावलेत, एकंदरीत देखभाल, frequency उतरवण्याची, शेतकऱ्यांचे अपार कष्ट, प्रेम, आशीर्वाद ... असे अनेक गुणधर्म लक्षात आले.
ह्या सर्वा पलिकडचे म्हणजे कसं
काय
त्या मोट्ठ्या नारळात पाणी जातं, आणि
त्याची चव इतकी गोड / मधुर कशी असते आणि ते बऱ्याच रोगांवर किंबहुना रोग होऊ नये म्हणून का पितात ..... सर्वच माझ्या साठी शब्दा पलीकडले ...
रविवार, १३ जून, २०२१
शब्दा पलीकडले ...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा