आज आमच्या ब्राह्मण सांस्कृतिक संघाने आयोजित केलेला तिळगुळ समारंभ होता. आधी हा कार्यक्रम एका मोठ्या हॉल मध्ये होणार होता, कि ज्या हॉल पर्यंत पोचण्यास किमान २० एक पायऱ्या आहेत. ते ऐकुनच मी कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला. खूप वाईट वाटलं त्याबद्दल.
कुठे तरी
मनापासून माझी इच्छा होती कि ह्या वेळी मला जायचं आहेच कसही करून. पण सुचत नव्हतं काही. त्यात एका अनोळखी मैत्रिणीचा जी कि ह्या संघात आहे तीचi संदेश आला कि नाराज होऊ नकोस. जर ठिकाण बदलले तर तू येऊ शकशील. थांब जरा. आणि तस्संच झाला. कदाचित माझी इतकी तीव्र इच्छा होती सर्वांना भेटण्याची कि त्यासाठी कार्यक्रमाचे स्थळच बदलले. आश्चर्य आहे. आनंद गगनात मावेना असा झालाय. जस कि फक्त माझ्या साठीच हे नवीन ठिकाण आणि अख्खा कार्यक्रम होता.
खूप
खूपच छान / अप्रतिम आयोजलं होता सगळं. शब्दा पलीकडले. प्रचंड ऊर्जा मिळाली कवीच्या कविता ऐकून, उत्साही उखाणे अनुभवून, हळदीकुंकुम+वाण, तिळगुळाची चव, वैविध्य फोटो आणि
बरेच काही. ८० लोकांबरोबर संवाद साधण्यास वेळ कमी पडला.
Wrote on FB Wall on 3rd Feb 2019.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा