बुधवार, २ जून, २०२१

गुरु

छूकर मेरे मन को
किया तूने क्या इशारा
बदला ये मौसम
लगे प्यारा जग सारा....

गुरुपौर्णिमेचा दिवस होता परवा. सकाळी गाडीतून ऑफिस ला जातांना हे गाणं ऐकलं. आणि अचानक मला ह्या गाण्याच्या धुर्वपदात आणि त्या खास दिवसात साम्य आढळलं. म्हणून हा उहापोह इथे लिहिण्याचा.

खूप वर्ष / दिवस जेव्हा तुम्ही कोणा यशश्वी किंवा माननीय व्यक्तीला (/वस्तू, प्राणी, .) ऐकता, निरीक्षण करता, अनुसरण करता . तेव्हा तुम्ही त्यांना गुरु स्थानी मानता, अर्थातच अपवाद आहेत बरेच "गुरु" ह्या संस्थे बद्दल. असो.

तर माझ्या मते मनाला स्पर्श जो करतो तो गुरु (त्याच्या वागण्याने, बोलण्याने, कृतीने .), बरोबर. =>छूकर मेरे मन को
(
श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतातच "बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले")

आणि गुरु हे सतत शिष्याला अचूक मार्ग दाखवत असतातच, कळत-नकळत. ज्यामुळे बहुतेक प्रत्येक वेळेला शिष्याला नवनवीन शिकायला मिळतं, बोध मिळतो...=> किया तूने क्या इशारा

जणू काही आजूबाजूच सगळं जगच बदलत चाललंय किंबहुना बदललंय. =>बदला ये मौसम

इतकं कि चहूबाजूला शांतता, आनंद, परमानंद आणि बरच काही ह्याचा अनुभव येतोच. => लगे प्यारा जग सारा....

Wrote this on my FB timeline on July 19th 2019.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...