माझी पिल्लं आता
जुनिअर कॉलेज ची विध्यार्थी होणार, कालच त्यांचा शाळेचा शेवटचा दिवस होता. नेहिमीच्या सर्व गोष्टी त्यांनी केल्या जसा कि मोठानी ओरडून जल्लोष साजरा करणे, एकमेकांच्या पांढऱ्या शर्टावर संदेश लिहिणे, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांना भेटणे इत्यादी... माझा लेक तर एक जास्तीचा झब्बा घेऊन गेला होता लिहिण्या करता आणि सांभाळून ठेवण्या करता. त्यातच भर म्हणजे जवळपास सर्व शिक्षकांनी फारच मोकळे पणे संवाद साधला, गोड-जोड्या हि माहित होत्या अशी कबुली दिली, आणि बरच काही.
दोन
वेगळ्या विचारांच्या आईनी मोठा बॉक्स भरून सर्वांसाठी संदेशासहित donuts पाठवले, दुसरीनी वैशाली स्पेसिअल डोसे पाठवले, चॉकलेट्स ची तर भरमाडच होती.
सर्व मित्र मैत्रीणीना खूप
वाईट वाटत होतं कि आपण पुन्हा एकत्र असे बिनधास्त दिवस घालवणे अशक्यच. ह्या व्हाट्स उप च्या पिढीला अस भावुक होतांना पाहिलं म्हणून जरा आश्रयच वाटलं मला. कित्येक आया पण वेळ घालवतात आहे सर्व मुलं बरोबर. त्यासाठी खास पार्टी पण आयोजित केली आहे, शाळे व्यतिरिक्त. सहीच ना. मला पण लहान झाल्या सारखा वाटतंय. खूपच वेगळा अनुभव पिल्लांच्या डोळ्यात बघायला मिळतोय. पंखात बळ देण्याचं काम तर केलंय, आता खरी परीक्षेची वेळ सुरु झाली माझी. परमेश्वर, मोठे, मित्र ह्यांचा आशीर्वादाने सर्व छान होणार अशीच आशा.
Jan
31, 2019, 10:44 AM on FB.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा