रविवार, ६ जून, २०२१

भन्नाट वैक्तीमत्व जशी कि झाशीची राणी....

मला अजूनही अगदी स्पष्ट आठवत एका जहाँबाज मुली बद्दल. ती माझी डिप्लोमातली सिनियर, एका वर्षांनी. त्यानंतर डिग्री आणि नोकरी. एक वर्ष मोठी असल्यामुळे तिला माझ्या आधी नोकरी मिळाली. त्याकाळी दूरसंचारी साधन नसल्यामुळे मला काही माहित नव्हत कि तेव्हा काय करते आहे, आणि ती माझी पहिली HoD झाली, एका नवीन कॉलेज मध्ये. आम्ही मैत्रिणी जास्त होतो, आणि राहिलो पण त्यानंतर आमच्या दिशा बदलल्या. एकत्र काम केल होता त्यामुळे खूपच अप्रतिम आठवणी आहेत जपून ठेवलेल्या. भेट झाली नाही कित्येक वर्षात, कळत होत तिच्या प्रगती बद्दल, पण आज प्रत्यक्ष बोलण्याचा अनुभव घेतलाच. ती जशी आधी झाशीची राणी होती त्याही पेक्षा कैक पटींनी मोठी झाली आहे आज आणि इतकी वर्ष सातत्याने टिकवलं तीच मोठंपण. थोड्याच दिवसात पण खूप केलय माझ्या साठी तिने. एक प्रफुल्लित उत्साहाचा झरा होती आणि आहे अजूनही. अत्यानंद झाला तिच्याशी बोलून आज, कित्येक वर्षांनी, पण अस वाटलं कि जस रोजच बोलतोय आम्ही दोघी. खूप खूप वर्ष सर्व ओळखीच्या लोकांपासून दूर राहिले मी, पण आता नाही. भेटून काय मिळेल हे मला माहित नाही, पण भेटणार हे नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...