शनिवार, ५ जून, २०२१

Patience or Solitaire Card Game...

माझे बाबा निवृत्त झाल्यावरहि लवकर उठणार, झाडांना पाणी घालणार, फिरायला जाणार, बगिच्यात इतर कामे करणार, पाणी भरणार, भाजी आणणार आणि बराच काही सतत स्वतःला सक्रिय ठेवणाराच. वाचन फार, विविध वर्तमान पत्रे, पुस्तके आणि बरच काही. हे सगळं करूनही वेळ असायचा, मग अतिशय प्रिय असा पत्त्यांचा डाव मांडणार / खेळात बसणार, तासंतास. दोन तीन प्रकारचे एकट्याने खेळायचे प्रकार.

हेच सगळे पत्त्यांचे प्रकार आता छोट्याश्या मोबाइल फोन वर पण उपलबध्द आहेत. मान आणि डोळ्यांची वाट लागते, वीज लागते ती वेगळीच. त्या विरुद्ध जर खऱ्या पत्ता बरोबर खेळलं तर मान मोडत नाही, का डोळे खराब होत नाहीत आणि वीज लागण्याचा तर प्रश्नच नाही.

आम्ही सगळेच अधे मध्ये बाबांच्या बरोबर त्या डावात घुसायचो, हे मोबाईल वर खेळतांना जरा अवघड आहे. चोरून खालचं पान बघणं मोबाईल वर तर शक्यच नाही, ती मज्जा काही औरच होती.

आमच्या कॉलोनीत एक अलिखित नियमच होता. परीक्षा संपली रे संपली कि उन्हाळा एकत्र साजरा करायचा. असंख्य प्रकारचे पत्ते खेळायचो. अगदी संध्याकाळ पासून ते अंधार पडेपर्यंत. मग दिवे लागणी, थोड्यावेळ आईला मदत, रात्रीच जेवण, आणि पुन्हा पत्ते. आंगणे मोठीच्या मोठी होती, मागे पुढे रोज संध्याकाळी सडा टाकायचा आणि सुरु. मैदानी खेळ हि व्हायचे मध्ये मध्ये. त्यावेळी मोबाईल नव्हते म्हणून जमलं काय कि.

कित्ती चपराक नाव दिलाय नाही ह्या खेळाला Patience. अगदी योग्य, तेव्हाही आणि आत्ताही.

हे आज लिहायच्या आधी म्हटलं जरा वाचावं कि का Solitaire म्हणतात ह्या पत्त्यांचा खेळाला, तर त्याचे दोन अर्थ सापडले. एक म्हणजे, एक मोठा बहुमूल्य असा खडा असलेली अंगठी आणि दुसरा म्हणजे एकटी / विधवा. म्हणून.. एकला चालो रे... एकट्याने खेळायचा गेम, बराच वेळ लागतो गेम संपवायला आणि अश्या सगळ्या कारणांसाठी कदाचित हे नाव दिल असे.

काही का असेना रोज बाबांची आणि जुन्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहत नाहीच.

https://www.vocabulary.com/dictionary/solitaire

Wrote this on FB on April 5th 2019.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...