शनिवार, ५ जून, २०२१

कुठून आणलीस...?

आज मी माझ्या एका मैत्रिणी बरोबर WestSide पर्यंत आले आणि तिथून रिक्षा घेतली. थोडं अंतर पुढे गेल्यावर वाहतूक सिग्नल वर रिक्षा थांबली. जशी थांबली तसा रिक्षा वाल्याचा मित्र दिसला शेजारीच उभा होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर तो मित्र विचारतो माझ्या रिक्षा वाल्याला "कुठे निघालास?" तोवर सगळं ठीक होत पण ह्या उत्तरा नंतर लागलीच दुसरा प्रश्न जो आला तो भयानक होता "कुठून आणलीस?".... त्याला "सवारी" म्हणायचं होत कदाचित, पण ते शब्द ओठातच राहिले देवा, काय हे संभाषण.
जाऊ दे, काही का असेना, मला लिहायला तर छोटासा विषय मिळाला आज.

रोजच्या रोज आजकाल ओला / उबेर ने जाताना एक गोष्ट लक्षात आली ती अशी कि सगळेच कॅब चालक सतत फोन वर असतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे मित्रच असतील कदाचित, आणि एकाच विषय, काल किती ट्रिपा केल्यास, कितीच्या केल्यास, कुठे कुठे पडल्या ट्रिपा .... आणि असच काहीस. काय गरज आहे चांभार चौकश्यांची, तेही गाडी चालवत असतांना. देवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...