उन्हाळ्यात मुंग्या येतातच, हे मला माहित होत. अस ऐकलं आहे कि गरमी मुळे म्हणे सगळ्या मुंग्या बाहेर येतात. त्याचा प्रत्यय येऊ लागलंय आमच्या घरी सध्या. सगळी कडे छोट्या छोट्या मुंग्या दिसताहेत आणि काही पदार्थाना पण लागल्या आहेत. त्या ना काळ्या आहेत नाही लाल, विचित्रच / वेगळ्याच छोट्या आकाराच्या आहेत आणि बऱ्याच आहेत संख्येनी. पण साधरणतः गोड पदार्थांनाच जास्त लागल्या आहेत. खडू लावून झाला, मुंग्यांची पावडर आणून झाली, त्याबद्दल चर्चा झाली आणि बरच काही...
आज सकाळी (परीक्षे नंतरची) सुट्टी स्पेसिअल न्याहारी दाबेली केली होती. त्या दाबेलीच / पावाचा अगदी छोटासा तुकडा चुकून ओट्यावर शेगडीच्या मागे पडला होता आणि दिसला पण नाही डोळ्यांना संध्याकाळ पर्यंत. अचानक मुंग्यांची भली मोठी रांग दिसली ओट्यावर, तेव्हा समजलं. माझी कन्यका बरेच काही बाही बोलत बोलत साफ करत होती, पाणी टाकत होती... तिच्या बडबडण्यात असं होत कि काहीच गोड सांडलं नाही आहे तरी कश्या काय मुंग्या झाल्या. त्यावर मी उस्फुर्त पणे अस उत्तर दिल कि त्या मुंग्या नागपूर च्या असतील, म्हणून त्यांना तिखट जास्त प्रिय आहे. आणि जो हशा पिकाला म्हणून सांगते. भलतीच मज्जा आली. खूप खूप धन्यवाद त्या मुंग्यांना, पोट धरून हसलो दोघी.
शनिवार, ५ जून, २०२१
खास नागपुरी...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा