रविवार, ६ जून, २०२१

पहिला दिवस

मी अनेक वर्ष सातत्याने पाळलेला एक संकल्प किंवा सवय म्हणावं हवं तर. मुलांना नॉर्मल दिवस होते तेव्हा रेगुलर शाळा असायची आणि दिवाळी उन्हाळा अश्या मोठ्या सुट्ट्या असायच्या. सुट्टया संपल्यावर पहिल्या दिवशी मी त्यांच्या डब्ब्यात गोड नक्की देत असे. कधी कधी तर दोघांना जे आवडेल ते, व्यवस्थित प्लॅन करून वगैरे. काय मज्जा यायची मला. कारण? १. समाधान वाटत होत, कि सुट्टीनंतरचा पहिला दिवस किंवा वर्षाचा पहिला दिवस तोंड गोड करून साजरा झाला २. त्यामुळे मला माझ्या डब्यात पण ऑफिस ला नेता येत असे गोडधोड. अहाहा, अवीट गोडी अशी ती आठवण आहे. आता मुलांची कॉलेजची सोय पुण्यात झाली, पाहिल्यासारखे कॉलेज सुरु झाले आणि पोट्टे "हो" म्हटले डब्बा न्यायला तर पुढे हि परंपरा सुरु राहील.

आज हे सगळं का लिहीत आहे हे विचारत असाल ना मंडळी. थांबा सांगते. उद्यापासून माझं ऑफिस चालू होणार आहे आणि उद्या माझ्या डब्यात गोड नक्की घेऊन जाणार आहे मी. त्याची आताच तय्यारी केली, लेक समोरच होती आणि तिला मी जेव्हा हे सांगितलं किंबहुना तिने हे जेव्हा बघितलं तेव्हा आम्हाला ते गोड दिवस आठवले. म्हटलं चला उघडा  लॅपटॉप आणि लिहा झरझर. या तर मग सगळे उद्या माझा डब्बा शेअर करायला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...