लहानपणा पासून फार
लवकर चालायला लागले, लठ्ठ असून सुद्धा. आणि
तेव्हा पासून नकळत माझ्या पावलांना किंवा त्यांच्यावर जो शरीराचं पूर्ण भर असतो, तो मी पूर्णपणे गृहीत धरला, किंवा असं म्हणायला हवं कि माझ्या पायांना, पावलांना फारच गृहीत धरलं मी, फार वाईट वागले मी. त्यांची काळजी घ्यायला हवी होती, अजिबात नाही घेतली, हे आता जाणवतंय. फार उशीरा. क्षमा असावी. आता एवढंच म्हणू शकते मी. परवा जरा चार पावलं जास्त चालले तर लागलीच सुजले दोन्ही पाय, आणि दुखले पण. फार फार भीती वाटली. पायात शक्ती नाही तर काहीच नाही, सर्व शून्य. वायुवेगाने चालावं लागतंच आणि त्यासाठी पायांची ताकद महत्वाची आहे. खूपच वाईट पद्धतीने आणि उशिरा उमगलं. पण आता काळजी घेणार हे नक्की, कदाचित हीच पावलांची परतफेड ठरेल.
का कुणास ठाऊक, पण मला हिंदी सिनेमाची दोन तीन गाणी आणि त्या गाण्याच्या steps फारच आवडतात. Rather मला त्यावर नाचायचं होत. मला नाचता अजिबात येत नाही. पण मी ठरवलं होत कि नक्की हे गाणं, स्टेप्स शिकणार, नक्की. पण आता ते कागदावरच. हरकत नाही. सगळंच ह्या आयुष्यात मिळेल असं नाही. बरोबर?.
Wrote on FB on March 31st 2019.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा