रविवार, ६ जून, २०२१

भले मोठे ओझे ....

कोणासाठी? पोटासाठी ...

आज ह्याचा प्रत्यय आला. माझं का कुणास ठाऊक पण खिडकी बाहेर लक्ष असतंच, पण आज प्रकर्षाने गेलं, ह्याच कारण असं कि दारावर माठ विकायला आले होते. आमच्याकड्चा माठ दोन+ वर्षाचा झाला, त्यामुळे आम्ही बघतच होतो नवीन माठ आणि दत्त म्हणून सुट्टी दिवशी दारात आला माठ वाला. त्याच्या कडे लाल काळे दोन्ही माठ होते, जवळपास ३० माठ असतील. हातगाडीवर दारात आलेला माठ वाला बघितला आहे, पण ह्याने एक लोखंडी भली मोठी टोपली करून घेतली होती आणि त्यात डोक्यावर भयानक वजन घेऊन भर उन्हात दारोदारी माठ विकण्यास फिरत होता. बापरे पोटात कस तरी झाल. कित्ती कष्ट ते, देवा. तीन जण मिळून ती टोपली उतरायला आणि चढवायला मदत करत होते पण तरीही जडच गेलं. काय होत असेल त्याच्या डोक्याचं, मानेचं. हे सर्व फक्त काही दिवस किंवा महिनेच, बरोबर. कशासाठी पोटासाठी. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहील नाही. साधारणतः एक माठ दुकानात १५० रुपयांना मिळत असेल, कदाचित. हा १८० रुपयाला देत होता. दोनशे रुपयाची नोट दिली तर २० परत केले त्याने. पण शक्यच नव्हतं आम्ही २० रुपये परत घेणं. पण त्याचा प्रामाणिकपणा फारच भावला. त्याचे सगळे माठ लवकरात लवकर विकले जावेत हीच प्रार्थना. प्लीज.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...