आमच्याकडे एक मावशी काम करतात बरीच वर्ष झाले, अगदी माझी मुलं लहान असल्यापासून. सुरवातीपासून त्यांची नात यायची कामाला. लहान होती पण अती उत्साहानी छोटी छोटी मदत करायची आजीला. हुशार होती, त्यामुळे अभ्यासही छान होता तिचा.
मावशीचं मोठा परिवार, २ मुलं आणि ३ मुली. सगळ्यांचीच लग्न फार लवकर होतात म्हणे त्यांच्याकडे. मावशीचं पण झाल होत, त्यांच्या मुलांची पण झाली आणि ह्या आमच्या कडे येणाऱ्या नातीच लग्न झालं काय मागच्यावर्षी आणि काल परवा मुलगा पण झाला. आणि अशा तर्हेने आमच्या मावशी पणजी आजी झाल्या. अजूनही सकाळी ४ वाजता उठतात, पाणी भारतात, घरची काम करतात, स्वयंपाक इत्यादी आणि मग जवळपास ५-६ घरची काम. माझ्या डोळ्यासमोर लहानाची मोठी झालेली मावशीची नात आज आई झाली, खूप छान वाटतंय. आत्ये मामे भावंडातच लग्न झालंय, त्यामुळे मावशीचा आनंद तर अजूनच द्विगुणित झाला आहे. चवथी पिढी बघणं म्हणजे भाग्यच, नाही का? त्या मुळेच लिहावंसं वाटलं आज त्यांच्या बद्दल. मावशींना असच उदंड आयुष्य लाभो आणि त्यांची प्रकृती ठणठणीत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
शनिवार, ५ जून, २०२१
पणतू ...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा