शनिवार, ५ जून, २०२१

एकदम चोख काम

एक गोड जोडपं आमच्या कचेरीत नेहेमी दिसत. मी काही एवढं लक्ष दिल नाही कि ते काय करतात किंवा कशासाठी येतात वगैरे. पण काही दिवसांपूर्वी त्यांना Members of Society च्या फलकावर काहीतरी चिटकवताना पाहिलं आणि मी लागलीच विसरले सुद्धा, त्यांच्या बद्दल. आज पुन्हां एक जोडपं माझ्या कडे काही चौकशी करण्यास आले, काही नाव कुठल्या विभागाची आहेत हे नक्की करत होते आणि मला त्यांना कुठे तरी पाहिलं आहे हे जाणंवलं, ओळख पटली आणि त्यानंतर आमच्या गप्पा सुरु झाल्या.

थोडक्यात म्हणजे ते आमच्या संस्थेचे सगळे फलक तयार करतात आणि सांभाळतात देखील. काही अदलबद्ल करायचे झाले तर ते हजर असतात. आमच्या संस्थेची वीट ठेवल्यापासून म्हणे ते संपर्कात आहेत, सहयोगाने काम करत आहेत.

काकू म्हणाल्या कि दोन मुलीची लग्न झालीत, त्यामुळे आम्ही दोघे आता पूर्ण मोकळे. आणि आम्हाला हे काम फारच आवडत. काका हे काम कित्येक वर्ष अविरत करत आले आहेत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने. त्यांना कुठलीच तडजोड आवडत नाही. आमच्याकडे कामाला मुले आहेत पण त्यांना हे काम चिल्लर वाटतं. त्यामुळे ते यायला बघत नाहीत. म्हणून आम्ही दोघे येतोच बरोबर. आताशा खुर्चीवर चढून चिटकवणं वगैरे काकांना एकट्याला जमत नाही, म्हणून मीही येते बरोबर.

हे दोघे आपापल्या संथ गतीने पण एकदम चोख काम करत फिरत असतात, एकदम साध्या सोप्या पद्धतीने फलकावर नाव लिहिणे, मिटवणे आणि अशी तत्सम कामं ते करतात. अप्रूप वाटण्यासारखंच. आत्ता आठवलं मला, त्यांच्याशी बोलणं झाल्यावर. म्हणजे माझ्या नावाचा फलकही त्यांनीच लावला असेल. छान वाटलं त्यांच्याशी बोलून आज. बरंच वय आहे दोघांचं. ह्याही वयात इतकं दूर गाडी चालवत येणं आणि सक्रिय राहणं म्हणजे जबरदस्तच, नाही का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...