माझ्या लहानपणी मी असंख्य अगणित पंक्तीं मध्ये जेवले आहे. तेव्हा एक प्रचलित अशी पत्रावळ्या ची पद्धत होती. सर्रास पत्रावळ्या आणि द्रोण वापरायचे. अर्थात त्याची अनेक कारणे होती. जसे कि स्वस्त असायचे, घासावे लागत नाही, पटकीनी मातीत मिसळून जातात कारण ते वेगवेगळी पाने एकत्र करून तय्यार केले असतात, हलके असतात, विकत आणायला सोप्पे. (हवेत हि उडतात त्यांच्या छोट्याश्या वजनामुळे). प्रत्येक पानाचं आणि त्याला जोडणाऱ्या छोट्याश्या काडीचं अनन्य साधारण महत्व आहे. द्रोणतली सगळ्यात खालची / बेस पाने हि जरा दणकट असायची आणि जी लवचिक नसायची. आजूबाजूला वाटीच्या आकारात लावलेली पाने थोडी पातळ आणि लवचिक असायची. त्याकाळी हस्तकला च म्हणावी लागेल द्रोण तयार करणे म्हणजे. आताशा साचे आले आहेत म्हणे. असो. इतकं करूनही बरेचदा वाढलेली आमटी / पातळ भाजी ई. सांडायचीच पानात. एकंदरीत वेगळाच थरारक अनुभव असायचा.
त्यानंतर आला
तो आधुनिक वॉफल्स चा द्रोण. कागदाच्या वाटीत दिमाखात विराजमान झाला तो. त्याचा आकार म्हणजे प्रेमातच प|डणारा, चव म्हणजे काय विचारता. त्यात म्हणजे आता तर विविध रंगात नटलेला असा तो द्रोण आदळआपट केलेलं गारेगार आईस्क्रीम बखुबीनें सांभाळणारा. अहाहा. तो उचलायला सोप्पा, खायला चविष्ट आणि तयार करायला तर साचाच. आनंदीआनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे ... (Crame Stone, Osho
Stone Icecreame cafe waffle)
आणि
ह्याच शाब्दिक कुटुंबात अजून एक जण जमा झालाय तो म्हणजे अत्याधुनिक ड्रोन. हवेत उडणारा, देशातच नाही तर सर्व जगात विविध कारणाने वापरल्या जाणारा, अनेकविध बुद्धिवान तुकड्यानी तयार केलेला, विविध सॉफ्टवेअर च्या काड्यानी जुळलेला आणि त्याचा संपूर्ण नियंत्रण एखाद्या निपुणांच्या हाती.... असा तो. असंख्य इलेक्ट्रॉनिक्स चे उपयोगी असे भाग एकत्र करून एक विशिष्ट्य ध्येय गाठण्यासाठी तयार केलेले उत्पादन. खूप काळजी घेतली जाते हे तयार करतांना आणि वापरतांना सुद्धा पण तरीही सुरक्षिततेचा प्रश्न आहेच, ते आवाहन अजून गाठायचं आहे.
बरेच साम्य आणि
विविधता असलेले हे तीन बहुउपयोगी उत्पादने एकाच शाब्दिक कुटूंबातली मला लक्षात आले, म्हटलं लिहावं.
http://www.quadcoptercloud.com/drones-get-name/
https://www.wsj.com/articles/SB10001424127887324110404578625803736954968
https://www.iwm.org.uk/history/a-brief-history-of-drones
शनिवार, ५ जून, २०२१
द्रोण अक्का ड्रोन ...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
A simple bi syllable word in Marathi but gets so beautifully transformed through the prism of perspectives..
उत्तर द्याहटवाVery creatively penned down Anukatha..
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा