शनिवार, ५ जून, २०२१

फाटा...

 पाय-बळाची परतफेड (भाग १९)...


माझं सध्या जिथे वास्तव्य आहे त्याच्या जवळ एक चौक आहे त्याला फाटा असे हि म्हणतात. तर असा तो फाटा माझ्या घरापासून साधारणतः पाऊण किलोमीटर आहे, एक किलोमीटर पेक्षा कमी.

काल मला का कुणास ठाऊक पण अजिबातच टॅक्सी मिळाली नाही कचेरीत जाण्यास. मग मी पटकीनी निर्णय घेतला आणि मी जवळच्या बस थांबयावर पोचले रिक्षाने, बस पकडायला. बस ने कचेरीत गेले. भली मोठी बस असल्यामुळे ती कचेरी समोर रस्त्यावरच थांबली. तिथपासून मला पायी यावं लागलं. मीही विचार केला कधी तरी चालायचं अंतर वाढवावं लागणारच ना. असा म्हणून माझी सवारी सुरु झाली, एकेक पाऊल टाकत टाकत, कासवाच्या गतीने. अहाहा ... काय विचारता.

त्यानंतर कचेरीतील नेहेमीचं चालणं होतचं . आणि त्यानंतर मग माझे पाय बोलायला लागले, अत्यंत दुखायला सुरु झाले, अगदी डोळ्यात पाणीच थेट.... आज हि पुरलं ते पाय दुखणं. असो.

तर हि छोटीशी घटना मी माझ्या मावशींना सकाळी सांगत होते, कारण त्यांनीच मला मिठाचं गरम पाणी करून दिलं पाय बुडवायला. तेव्हा संपूर्ण किस्सा ऐकताच त्या म्हणाल्या "तुम्ही पायानी फाट्या पर्यंत गेलात बस पकडायला?"

माझ्या पाय दुखण्याच्या विचारांना फाटा देत मीही मनात म्हटलंच "लवकरच जाणार मी, पायी, चौकापर्यंत.... नक्कीच.... ".

तर अश्या माझ्या मावशी, नकळत मला आव्हान देणाऱ्या...

पाठबळ हा प्रचिलित शब्द आहेच, पण पाय-बळ हा माझ्या साठी महत्वाचा असलेला सध्याचा लफ्ज.

Wrote a series of articles depicting my tiny experiences related to legs on FB titled परतफेड, and this is one of them. This was wrote on FB wall on 16th April 2019.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...