शनिवार, ५ जून, २०२१

अपार कष्ट ...

सुशांत सिंग राठोड चा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता मागे, केदारनाथ, ज्यात त्याने देव दर्शनाला जाणाऱ्या लोकांना पाठीवर / डोक्याच्या आधारे उचलून घेऊन जाणाऱ्याच काम केलंय. त्यातलं एक गाणं आज सकाळी सकाळी माझ्या कन्येने लावलं होत दूरदर्शन वर. ते पाहतांना दोघींच्याही मनात एकच विचार आला, तो म्हणजे "कित्ती ते कष्ट, देवा". इतकं अवजड पाठीवर आणि डोक्यावर उचलून घेऊन जायचं आणि खाली आणायचं म्हणजे .... शब्द अपुरे पडतात हे लिहायला. अस झालंय. अंगमेहेनत, मनाची तयारी, शारीरिक क्षमता, प्रबळ इच्छा शक्ती, "त्याची" पण इच्छा, वेळ, संयम आणि बरेच काही. सुशांत राजपूत ने केलं ते हि कमालच पण थोड्या फार प्रमाणात त्यात कॅमेराची कमाल असेलही आणि इतका मोठा कलाकार म्हणजे त्याची खाण्यापिण्याची सोया, आराम, व्यायाम आणि इतरही गोष्टी ची काळजी घेतली असेलच. पण जे प्रत्यक्ष हे काम करतात, उन्हा तान्हात त्यांचं काय होत असेल, कल्पनाही करवत नाही. परमेश्वर आहे त्यांच्या पाठीशी पण तरीही, पोटासाठी कित्ती ते कष्ट. असे मिळून मिळून किती पैसे मिळत असतील त्यांना. त्यांच्या खाणं पिण्याचं काय, आराम, बदल . नाहीच ना. वर्षानु वर्षे तेच काम.

मी अस ऐकलं आहे कि वैष्णव देवी ला पण डोलीतून उचलून घेऊन जातात, आपल्याला साधं चढण मुश्किल, आणि हे बघा. हि ही माणसाचं ना शेवटी.

बहुतेक वय झालेली किंवा सहज चढण ज्यांना शक्य नाही अशाच सगळ्या जाणंच ओझं वाहत असतील हे पिठो मंडळी (people who carry pilgrims on their back). खरंच गरज आहे का जाण्याची, "दोन हस्तक आणि एक मस्तक" पुरेसं नाही का देवाला? (with due respect and believe in God for sure) मला माहित आहे कि त्यांचं ते कामाचं आहे, आणि बरीच वर्ष त्यांना सवय पण आहे, तरीही नको वाटत.

चित्रपटात / गाण्यात दाखवल्याप्रमाणे हि मुलं फक्त भक्तांना देवदर्शनाला घेऊन जात नाहीत तर चेहेर्यावर हसू कायम ठेऊन संपूर्ण माहिती देणे, सेल्फी काढणे, फोटो काढणे अशीही कामे करतात. मला त्याच धर्तीवर काढलेला "नन्हें जसलमेर" नावाचं हि चित्रपट आठवतो. बघण्या सारखा आहे तो हि.

काही वर्षातच श्री वैष्णव देवी देवस्थानाला जाण्यास थेट रेल्वे होणार आहे असा कळलं, मग जरा पिठो लोकांचे कष्ट कमी होतील.

जोवर एकटा माणूस ओझं वाहतो तो वर थोडं तरी ठीक आहे पण जेव्हा एखाद जनावर त्यात असत तेव्हा तर त्यांना त्या मुक्या प्राण्यांचे पण संगोपन आले, त्यालाही आराम, भरपूर आवश्यक ते खाण पिणं आलाच कि.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...