मराठीत भारद्वाज, कुंभार कावळा या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी डोमकावळ्याच्या आकाराचा आहे.तसेच याला पान कावळा, लाल कावळा, सुलक्षणी, कुंभारकुकडी, कुक्क्कुटकुंबा, कुक्कुडकोंबा या नावानेही ओळखतात.[१] याला इंग्रजीत Greater Coucal or Crow
Pheasant असे
म्हणतात तर याचे शास्त्रीय नाव सेंट्रोपस साईनेसिस (Centropus
sinesis) असे
आहे. भारद्वाजही ककु
कुटुंबातील सदस्य असला तरी
हा इतरांच्या घरट्यात आपले अंडे टाकून निघून जाणारा पक्षी नाही.
झुडपी जंगल, खुले मैदानी प्रदेश, गवताळ प्रदेश अशा
भागात आणि
मनुष्य वसतीजवळच राहणे पसंत असलेला भारद्वाज, जास्तवेळ जमिनीवर राहतो. नर-मादी सारखेच दिसतात. लहान-मोठे किडे, पाली, सुरवंट, उंदीर,सरडा हे याचे मुख्य अन्न आहे.
एकाने कुप
कुप
कुप
करत
आवाज सुरू केला की दुसरा लगेच तसाच आवाज काढतो आणि हा खेळ एका मागे एक ५ ते २० वेळापर्यंत आवाज काढून सुरूच राहतो. भारतभर सर्वत्र आढळणारा हा पक्षी अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहे.
हि सर्व माहिती मराठी विकिपीडिया वर आढळली मला आज.
दुर्मिळ नाही म्हणता येणार, पण क्वचितच दिसणारा असा हा मोठ्या आकाराचा पक्षी, ज्याचे गाणे / आवाज ऐकणे शुभ समजले जाते. बहुतेक सकाळच्या वेळी जास्त ऐकू येतो ह्या पक्षाचा आवाज.
कधीही कुठंही दिसणारे, आवाज करणारे सामान्य पक्षी म्हणजे कावळा, चिमणी, टिटवी, कबुतर वगैरे. पण भारद्वाज वेगळाच, त्याच रूप वेगळं, आकार वेगळा, देखणा, आवाज मधुर आणि फक्त आपलं चांगलं काम करणारा असा. सहज माझ्या मुलांशी आज ह्या विषयावर बोलणं झालं / संवाद साधला तेव्हा अस वाटलं कि प्रत्येकानं सामान्य पक्षानं सारखं जे कधी कधी उपद्रवी पण ठरतात, तस व्हायचं कि थोडास हटके वेगळं व्हायचं आणि राहायचं भारद्वाज सारखं. भारद्वाजाचा आवाज ऐकू आला कि नकळत हात जोडले जातात आणि प्रसन्न वाटतच मला.
आमच्या मेडिटेशन च्या वर्गात हि आवर्जून सांगतात, कि प्रयन्त पूर्वक दुसऱ्यांच्या दुःख / अडचणी दूर करण्याचा प्रयन्त करा, जमल्यास "हवं हवंस" व्यक्तिमत्व तयार करा, न कळत प्रार्थनेच्या स्वरूपात सतत मदत करा दुसऱ्यांची. आणि बरच काही....
माझे वडील नेहेमी सांगायची कि श्री. दत्तात्रय (त्रिमूर्ती) ह्यांनी २४ गुरु केले / होते. अगदी मुंगी पासूनही शिकण्या सारखं आहे अस त्यांचं म्हणणं होत.
तसच
प्रत्येकाकडून चांगले गुणधर्म टिपले तर? वेगळाच विश्व निर्माण होईल ना.
https://drkrishi.com/greater-coucal/
Wrote on my FB wall on 18th April 2019.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा