शनिवार, ५ जून, २०२१

हनुमान जन्मदिन ...

माझ्या शाळेच्या दिवसात आम्ही आवर्जून श्री. हनुमान जन्म दिवस साजरा करायचो. नागपुरात गिट्टीखदान नावाचा एक भाग होता, बराच दूर, त्या ठिकाणी गोदावरी आश्रम होता मोठाच्या मोठा. त्या नयनरम्य आणि निसर्गरम्य भल्यामोठ्या आश्रमात एक छोटस हनुमानाचं मंदिर होत. तिथे साजरा व्हायचा उत्सव. प्रसन्न वाटायचं, छान पूजा अर्चा व्हायची, त्यानंतर तीर्थ प्रसादही. अनेक वर्ष आम्ही तिथे सेवा केली.

त्यानंतर मोठ्या वर्गात गेल्यावर आम्ही सरकारी घर सोडून दुसरी कडे राहायला गेलो आणि त्यानंतर मग कॉलनीतील एका मंदिरात जायला लागलो. दर शनिवारी चुकता सगळ्या मैत्रिणी आवर्जून दर्शनाला जायचोच. काहीही झालं तरी. अर्थात दर्शन घेणे हे जितकं महत्वाचं होत तितकाच मैत्रिणी बरोबर अमूल्य असा वेळ घालावंण सुद्धा. गप्पा, पोटभर हसणं, एकत्र वेळ घालवणं, काही काम / खरेदी, आणि बरेच काही होत असे दर शनिवारी. त्यामुळेच श्री. हनुमान जन्म च्या दिवशी आम्ही त्याच देवळात भक्तांना प्रसाद वाढायला जात असे, सेवा म्हणून.

अशा पद्धतीने छोट्या वर्गापासून ते अगदी विद्यापीठात असेस्तोवर छानच साजरी झाली श्री. हनुमान जयंती. आज झर्रकन डोळ्यासमोरून चित्रफिती सारखे सगळे गोड दिवस आले आणि ऊर्जा देऊन गेले. अहाहा. काय होते ते दिवस, भन्नाटच.

सगळ्या मैत्रिणीची आठवण झाली. आज जिथे कुठे त्या असतील त्यांना उचकी लागली असेल नक्कीच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...