रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

सोबत

माझा एक स्वभाव आहे, मला सदोदित सर्व जण माझ्या डोळ्यासमोर हवे असतात, कोणीही कुठेही जायला नको असं वाटत. (अर्थात बहुतांशी सगळ्यांचंच असं असेल).  म्हणजे दिवसभर ठीक आहे शाळा, ऑफिस, कामं असतात पण बाकी च्या वेळी सगळ्यांसोबत राहणं च मला भावतं. हे नेहेमीच सगळ्यांसाठी शक्य असत असं नाहीच. कारण

१) शिक्षण म्हटलं कि बऱ्याचदा घरापासून दूर जावं लागत
२) नोकरीची ठिकाण विविध असू शकतात, संधी जशी येईल तशी
३) लग्न झाल्यावर मुलगी एकाच शहरात राहिली तर उत्तमच
४) मग पुनःच हरी ओम

बाहेर पडणं हे दोघांकरता फारच अवघड असत, जो पडतो / पडते आणि घरच्यांना देखील. ज्यात राहणं, खाणं-पिणं, सहवास, काळजी ई. बदलत च. पर्याय नसेल तर करावंच लागत पण इतकं सोप्प नसत ते. अर्थात काही जण ते दाखवतात काही लपवतात.

सध्यातरी तंत्रज्ञानामुळे थोडसं सोप्प झालाय दोन्ही जणांना, दररोज एकमेकांना प्रत्यक्ष बघून बोलता येत. ते बोलणं रेकॉर्ड करून ठेवता येत. निरोप पाठवणं, फोटो पाठवणं, आपल्या आवाजात छोटेखानी निरोप पाठवणं, ई. सहज करता येत. त्यामुळे मुलं दूर गेली जरी शिक्षणासाठी तरी थोडीशी जवळीक साधता येतेच. एकमेकांना लागलंच तर फॉलो करून बघता येत, पालकांना देखील लॉगिन दिल जात त्यामुळे विद्यालयात थोडक्यात काय चाललंय ते पण बघणं शक्य होत.

पण तंत्रज्ञान विकसित होण्या आधी तर फक्त पत्र, कधीतरी फोन, किंवा वर्षातून एकदा / दोनदा भेट एवढंच मर्यादित होत.  त्या जमान्यात शिकायला / नोकरी करायला किंवा सासरी जाणं झालं त्यांचं काय? संमिश्र भावना असतात. काळ हेच औषध असत आणि काही दिवसांनी सगळं सुरळीत झाल्यासारखं दिसत, पाहणाऱ्याला.

मुलीची आई झाली कि ती एक दिवस आपल्याला सोडून सासरी जाणार आणि सासरचीच होणार हे जरी माहित असलं तरी वेळ आल्यावर सावरणं फार अवघड. तसेच मुलं पंख फुटले कि उडून जाणारच हे जरी पक्के असलं तरी त्या मनाला समजावणं लई अवघड. त्याचा अर्थ अडथळा निर्माण करायचा असं मुळीच नाही, पण मार्ग चाचपडत का होईना शोधावा लागतो, आणि शोधला जातोच.

एका छताखाली / आपल्या शहरात / देशात राहून प्रगती होत नाही असं नाही, पण त्या भावनांचं / विचारांचं करायचं काय? आवर घालणं जमायला हवं सहज.

मी सासरी गेले, एक फार मोठी पोकळी निर्माण झाली असणारच घरी. त्यावेळी मी दुसऱ्या टोकाला / बाजूला होते त्यामुळे ते फारसं लक्षात आलं नाही माझ्या, पण जेव्हा आता असं दृष्टीपथात दिसतंय कि माझी लेकरं लवकरच आकाशाला गवसणी घालतील तेव्हा समजतंय कि माझ्या घरच्यांचं झालं असेल ते. दुसऱ्याला समजावून सांगणं फार सोप्प पण आपण जेव्हा ह्या सगळ्यातून आपण  जातो तेव्हा प्रकर्षाने जाणवतं, प्रत्यक्ष सोबत किती महत्वाची असते ते, माणसं आणि प्रत्येक जण सतत नाही तरी काही ठराविक काळानंतर प्रत्यक्ष भेटणं फारच आवश्यक. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...