शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

बाउन्सर आणि सुखद अनुभव

माझी मुलं अगदी बाळं होती तेव्हा पासून आमच्या कडे दोघांचे दोन बाउन्सर्स होते. फारच सोय होती ती, त्यांच्या साठी आणि माझ्या साठी देखील. त्याची असंख्य कारणं आहेत. एक म्हणजे ती आराम खुर्ची होती त्यांची. त्यात विविध रंगबिरंगी खेळणी लटकवली होती समोर मोटर स्किल्स / वाढ होण्यास मदत होते त्यांची ई., त्याचे पाय स्कूटर ला किक मारल्यासारखे हालले कि फारच उत्कृष्ट आणि प्रेरित करणारे आवाज करत असे ते बाउन्सर. अहाहा. असं वाटायचं कि स्वतःच बसावं आणि.....

ह्या सगळ्या शिवाय एक अजून भन्नाट गोष्ट होती ह्या बाउन्सर्स मधे, ती म्हणजे स्पंदने. एक छुटुकलं बटन होत त्याला, ते सुरु केलं कि अहाहा, ब्रह्मानंदी लागायलाच पाहिजे बाळाची. काय काय सोय असते नाही आजकाल. मज्जा च मज्जा.

आज हा विषय का म्हणताय? सांगते.

मॅट्रिक्स - रिदम थेरपी हि एक जादू आहे, फिझिओथेरपी मधे, त्यात पण स्पंदने / लहरी / तरंग असतात जे थोडासा बिघडलेला शरीरातला रिदम वठणीवर आणण्यास मदत करतात. कुठेही असुदे दुखणं, पण जादू मुळे संपूर्ण शरीराला तजेलदार वाटत. अगदी बाउन्सर सारखं. अहाहा. मी प्रत्येक माझे रिदमफूल सेशन्स खुप मनसोक्त उपभोगते. बाउन्सर मधे न बसता पुरेपूर उपभोग अगदी तस्साच नाही त्याही पेक्षा खूप वेगळा आणि सुखद असा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...