शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

चुणचुणीत मनगटी घड्याळ

गेले १० एक वर्ष म्हणायला हरकत नाही सगळे स्मार्ट झाले आहेत, सर्वार्थाने. कसे म्हणताय, सांगते. सगळ्यांच्याच हातात स्मार्ट फोन आला होता आणि तो सातत्याने अधिकाधिक स्मार्ट होत गेला. स्मार्ट फोन हाताळणारे पण अर्थातच स्मार्ट, नाही का?. असो. हा प्रवास तेथेच नाही थांबला. तो अधिकाधिक विविध साधनां मार्फत स्मार्ट होत राहिला. जसे कि स्मार्ट-घड्याळ, स्मार्ट मनगटी घड्याळ. सगळे स्वतःचे डॉक्टर पण झाले, आतबाहेर काय काय चाललंय, अगदी पावलोपावली हे देखील समजायला लागलं. प्रत्येक श्वासाचं गणित मांडलं गेलं, आकडेमोड च सगळी. असो.

ह्या सगळ्या आकड्यांचे फायदे पण अनेक आहेत जर त्याच्या कडे फक्त माहिती म्हणून बघितलं तर.

सर्वांना आता हे माहिती आहे कि आजकाल घड्याळाचे काम फक्त वेळ सांगणे नाही. मुलींकरता तो एक दागिना झाला आहे, हिरेजडीत दागिना, प्रचंड महाग. तसेच "प्रवाह पतित" होणे गरजेचे आणि समाधानाचे, ओढूनताणून नाही. सहज जमत असेल तर. आणि सध्याच्या ह्या स्मार्ट घड्याळाची किंमत पण वाजवी आहे. फॅशन म्हणून पण असंख्य जण वापरतात अगदी तरुणांपासून ते जेष्ठ नागरीकांपर्यंत सर्वच. मस्त मिरवतात वैविध्य स्मार्ट घड्याळ, अहाहा. तरुण झाल्यासारखं वाटत असेल कदाचित त्यांना.

मला विचारलं ह्या आधुनिक स्मार्टनेस बद्दल तर सोप्प आहे, भरपूर काम करा, ऑफिस च्या वेळेला. त्यानंतर मुलांसोबत / घरच्यांसोबत / घरात वेळ घालावा. जमतील तेवढे साध्या पद्धतीने छंद जोपासा, खळखळून हसा, पोटभर आवडेल ते खा आणि मस्त व्यायाम एन्जॉय करा थोडासा. म्हणजे सतत किती पावलं चाललो, हृदय किती वेळा धडधडलं, आणि असे बरेच काही जाणून घ्यायची गरज नाहीच.

एवढ्यातच मी काही कारणा करता एका घडाळाच्या दुकानात गेले होते. तेथे एक उच्च मध्यम वर्गीय वडिल आले होते. कदाचित त्यांच्या बरोबर त्यांचे चिरंजीव होते, मला माहित नाही. पण ज्या पद्धतीने वडिल भुंकत होते मुलावर माझा रक्तदाब वाढला. सर्व दुकान हादरवून टाकलं होत त्या वडिलांनी. बाप रे. मुलगा कित्ती आळशी आहे, कुठलाही व्यायाम करत नाही, अगदी आई वर कसा गेला आहे ई. आणि तरी पण ह्याला महागडं आणि स्मार्ट घड्याळ हवं आहे. कशासाठी? ई.  मुलाने मनाला लावून घेऊ नये म्हणजे मिळवलं. अपमानच होता तो, जरी दुकानदार त्यांना ओळखत नसले तरी देखील. असो. वडिलांना सद्बुध्दी मिळो आणि त्यांनी / कुठल्याही पालकांनी असं प्रदर्शन मांडू नये म्हणजे पण मिळवलं.

आज नवनवीन साधनं सर्वांसाठीच आहेत, कोणीही कसाही त्याचा उपयोग करावा, अगदी साधी फॅशन म्हणून ते वापरून तर बघू, ते व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणून किंवा गरज म्हणून. असो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...