मी असंख्य वेळेला ऐकलं आहे ह्या शब्दाचा फुल्ल फॉर्म = सारख्या सूचना ज्या जुन्या काळी सासूबाई देत असत.
आत्ता पण असतील पण बोटावर मोजण्या इतक्या च.
पण गेले कित्येक दिवस काय महिने / वर्ष मी एक अनुभव घेतला आहे आणि मला असं आढळून आलं आहे कि त्या माउलीला बिच्चारीला उगाचच बदनाम केलं आहे. सारख्या सूचना फक्त सासूबाईचं देतात असे नाही, आजकाल सगळेच देतांना दिसतात. नको असतांना, विचारलं नसतांना "उचलली जीभ आणि लावली टाळ्याला" असं सुज्ञ माणसाने कधीही करू नयेच. मला आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा मी सतत हे बघितलं कि २०२१ साली देखील वडिल आणि आई नको तितके मुलांमधे ढवळाढवळ करतात. काही मुलं ऐकतांना दिसतात देखील, पण का? एक पिढीचं अंतर असतं दोघांमधे मग का? आणि नको तितकं, दुसऱ्यांसमोर, सतत, "जिभेला हाड नाही" हे सतत सत्यात उतरवून काय साध्य होत ह्या पालकांना? पाणउतारा करणं ते पण स्वतःच्या मुलाचा / मुलीचा ते पण बाहेर, हे करून पालक म्हणून काय मिळतं? दुसऱ्यांसमोर शोभा. असो.
माझी दाही बोट तोंडात जातात जेव्हा मी बघते कि उच्च विद्याविभुषित पालकांना एवढा वेळ कसा मिळतो ढवळाढवळ करायला? कामं नाहीत का त्यांना? किती त्याब्यात ठेवायचं, एवढा कंट्रोल काय कामाचा?
बहुतेक हा पिंड असतो अश्या लोकांचा, सतत स्वतःला मोठं आणि दुसऱ्याला नगण्य समजायचं. कुठेतरी फक्त आम्हीच कष्ट केले बाकी सगळे आरामात जगतात हि एक फार मोठी चुकीची समजूत.
असो, सर्वांना सदबुध्दी मिळो आणि प्रत्यक्ष / खऱ्या सासूबाईंनी सध्या सूचना देणं सोडलं असेल पण असे पालक त्यांची कमी पूर्ण करत आहेत / करतांना दिसत आहेत. स्वतःच्या मुलांसमोर चांगला आदर्श उभा करावा सगळ्या पालकांनी. एवढीच माफक अपेक्षा. आणि अर्थात हे सगळ्याच क्षेत्रात लागू पडत, जेथे जेथे फुकटचे सल्ले दिले जातात.
शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१
सा-सू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा