एक आजी जी आधी तिच्या दोन्ही मुलांसोबत राहत होती ती काही कारणांनी आधुनिक वृद्धाश्रमात दाखल झाली. तिच्या लाघवी स्वभावामुळे तेथे राहिली काही वर्ष पण का कुणास ठाऊक पुन्हा घरी राहायचं म्हणू लागली. पण ह्या वेळी थोडी वेगळी इच्छा व्यक्त केली आजीने. तिची एक आवडती नातं आहे तिच्या सोबत राहायचं असं सांगण्यात आलं. पुढचं कथन करण्या आधीच सांगते मंडळी, आजी हे सगळं मांडतांना फक्त वय वर्ष ९७ बरं का आणि नातं ५०शीची साधारण. फक्त ९७, पण प्रचंड उत्साही आणि दणकट. आर्मी मधे होते काका आणि त्यामुळे असेल कदाचित एक शिस्त, शूरता आणि आदराने मिळणारं निवृत्तीवेतन देखील. दोघीही तश्या मोकळ्या, सुटसुटीत आणि जबाबदारी नसलेल्या एकट्या. ठरलं, घर शोधाशोध सुरु झाली, अनायासे भाड्याने छोटेखानी घर मिळालं, दोन मावश्या कामाला लाभल्या आणि मग काय ती आणि ती च्या सोबतचा नाविन्यपूर्ण प्रवास सुरु झाला. सोप्पा नव्हता आणि नाही तो, वेगळ्या ठिकाणी, सगळं नवीन सुरु करणे म्हणजे. दोघींना साष्टांग दंडवत, ती विचार काय मांडते आणि ती ताबडतोब तय्यार काय होते. मानलं बुवा दोघींना.
सख्खी आज्जी नाही हो हि, मावशी, तरी देखील बसलेली घडी, राहत घर इतक्या वर्षाचं, ठरलेला येण्या-जाण्याचा मार्ग, सवय ई. ना सोडून नव्याने सुरु म्हणजे .... सगळंच भिन्न, वेगळं, अनोळखी, नवखं..... . पण ती ची ती बरोबरीची घौडदौड मस्त चालू आहे. ती अशीच भन्नाट सुरु राहो हि प्रार्थना.
शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१
ती आणि ती
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा