लहानपणी माझ्या आजूबाजूला असंख्य समवयस्क मैत्रिणी होत्या, भरपूर. उन्हाळ्याच्या किंवा सुट्टीच्या दिवसात घरीच दुपारी खेळाता येतील असे साधे खेळ म्हणजे भातुकली, पत्ते, बाहुली, आणि असे बरेच. हे सगळं खेळत असतानां खाऊ तय्यार करायची भारी हौस आम्हाला. चिकाटी आणि संयमाने मग दोन शेंगदाण्याचे भाग घेऊन त्यात मधे गुळ लावून चिटकवायचं, आणि ते लाडू म्हणे. देवा. त्या सोबत बहुतेक मुरमुरे. मग हे सगळं वाढून कशात द्यायचं? हा यक्ष प्रश्न. भातुकलीचे भांडे होते पण ते कमी पडायचे, आम्ही खूप जणी होतो त्यामुळे.
आमच्या घरी त्यावेळी भिंतीवर लावलेला एक कप बशी स्टॅन्ड होता. त्या स्टॅन्ड च्या खाली मी उभी राहायचे आणि निरखून बघत असे. माझा काही हात पोचत नव्हता तेव्हा. बऱ्याचदा आईने पण बघितले. मग न राहवून विचारलं कि काय चाललंय, ताबडतोब उत्तर तय्यार "ह्या सगळ्या कप बश्या आताच्या आता खाली पडल्या पाहिजेत, म्हणजे आम्हाला काचेचे तुकडे मिळतील, छोट्या बश्या / भांडी म्हणून, भातुकली खेळतांना. काय हे, काहीही विचार. अर्थात आईने ते हसण्यावारी नेलं आणि मला त्यामुळे अजून एक जास्त प्लेट्स आणि वाट्या असलेला खेळभांडी चा सेट मिळाला, आणि मज्जा आली. असे ते सोन्याचे दिवस, त्या मैत्रिणी, ते साधपण आणि ते एकमेकांसोबत चे खेळ.
त्यावेळी कुतूहल आणि उत्साह प्रचंड आमच्या मैत्रिणींमधे कारण घर-घर हा एक खेळ प्रकार होता फक्त, बाकी काही नाही आमच्या साठी.
शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१
भातुकली / घर-घर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा