माझ्या कचेरीच्या रस्त्यात एक लक्ष वेधून घेणार घर आहे. फारच मोठी खासियत आहे त्याची. पांढरा स्वच्छ रंग आहे बाहेरून आणि खिडक्या निळ्या+लाल आणि गडद काळ्या रंगांची फिल्म लावलेल्या अश्या. असो. ते दुरून दिसायला तर एकाच घर दिसत, फ्लॅट नाही. तीन मजली घर आहे ते. मागून पट्टाकिनी दृष्टीस पडत. मागच्या बाजूला १६ खिडक्या आहेत नेहेमीच्या आकाराच्या. ८ छोटेखानी खिडक्या दिसतात त्या बहुतेक बाथरूम च्या असाव्यात. ५ उभ्या खिडक्या दिसतात तो जिन्याचा भाग असावा. बस / रिक्षा / नजर बाजूच्या भागाकडे जाते तेथे पण पुन्हा नेहेमीच्या आकाराच्या ८ खिडक्या दिसतात. पलिकडचा दुसरा भाग दिसत नाही पण तेथे तसेच असावे कदाचित. मग घराच्या समोर बघितलं तर तीन बालकानी आहेत आणि पुन्हा ४ मोठ्या खिडक्या. बाप रे. गरगरल्या सारखंच होत, देवा. किती त्या खिडक्या आणि सदोदित बंद. हे एक कोडंच आहे?
एखाद घर बांधतांना खिडक्या अती जास्त प्रमाणात बांधल्या तर घर बांधण्याचा खर्च, देखभाल खर्च ई. कमी येतो का? देखभाल कमी करावी लागते का? वारा / हवा / सूर्यकिरणे जास्त मिळतात का? घर बांधतांना किंबहुना डिझाइन ची मान्यता मिळवण्या करीत काही प्रमाण नसतं का? किती भाग सिमेंट, किती खिडक्या आणि का? वैज्ञानिक / तांत्रिक मूल्य, नियम काय म्हणतात? रंग मारण्याचा भविष्य काळातला खर्च कमी करण्या करता हे असं केलं असेल का? त्या इतक्या सगळ्या खिडक्या साफ कोण करणार? सुरक्षिततेचे काय?
हे इथे मांडलेले प्रश्न तर काहीच नाहीत, फारच जास्त आणि रोज नवे प्रश्न उद्भवतात त्या घराला बघितलं रे बघितलं कि माझ्या समोर, काहीही संबंध नसतांना.
मग ठरवलं मी, आता बास, आज पासून प्रश्न नाही, त्या घराचं माझ्यासाठी नाव खिडक्यांचे घर, संपला विषय. अनोखे / अजीब घर. असो. ज्याचं त्याच्या बरोबर. ज्याची त्याची आवड.
आज पर्यंत फक्त कवेलू घर, रंगबिरंगी घर, झाडांनी वेढलेलं घर, सुबक घर, भव्य दिव्य घर, उत्कृष्ट वास्तू रचना असलेलं घर, खेड्यातलं घर ई. अश्या अनेक उपाध्या माहित होत्या मला. पण "खिडक्यांचे घर" फक्त आमच्या पुण्यातच हो.
गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१
खिडक्यांचे घर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा