एवढ्यातच मी लिहिल्याप्रमाणे माझ्या पायांच्या नसांना मजबुती येण्याकरता सकस आहार सुचवला आहे तज्ज्ञांनी. सकस आहाराचे फायदे डोळ्याला दिसत असले तरी देखील ते खाण्यापिण्याचे नियम पाळणं अवघडच आहे माझ्या सारख्या खवैईला. हे माझ्या लेकीला नक्की माहित आहेच. तिला माझ्या पायांची काळजी आहेच, त्यामुळे मी सांगितले ते सगळं खावं, वेळच्या वेळी, हि इच्छा देखील तिची. त्यामुळे सध्या अनायासे वेळ आहे त्याचा ती संपूर्ण सदुपयोग करून घेते आहे. आणि मला दररोज डब्यात काकडी, टमाटो ई. इतकं सुबक पद्धतीने चिरून आणि मांडून दिलेलं असत कि न खाणारा देखील नक्की आनंदाने, आणि पहिल्यांदा नजरेने आणि मग त्याच सेवन करणारच. कधी छोटे तुकडे, तर कधी मोठे, कधी आडवे तर कधी उभे, कधी काकडी खाली आणि टमाटो वर, कधी उलट, कधी अल्युमिनिम फॉईल ची उभी घडी तर कधी आडवी ई. सांगू तेवढं कमीच आहे, कौतुक आहे पोरीचं खरंच. अर्थात हे सगळं करतांना बदल हा तिला पण उपयुक्त आहेच, एकच एक काम एकाच पद्धतीने करणं पण कंटाळवाणं, नाही का?
माझ्या दृष्टीने काळजी असणं, इच्छा होणं आणि न कंटाळता करणं, सातत्याने करणं हे कौतुकास्पद आहेच. तिचा हा उत्साह, हि वैविध्यता कायम टिकून राहो म्हणजे तिला पुढे व्यावसायिक शिक्षण घेतांना, विविध प्रोजेक्ट्स करतांना, काम करतांना देखील उपयोगी होईल ह्यात शंकाच नाही. अर्थात सगळीच मुलं त्यांच्या त्यांच्या परीनं घरी हातभार लावत असतील देखील, पण मला माझ्या डोळ्याने जे दिसलं ते सातत्य महत्वाचं आणि मांडण्याजोगं.
रविवार, १५ ऑगस्ट, २०२१
काळजी - इच्छा - कौतुक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा