शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

वय झालयं

त्या काळी आणि वेळी मी फारच तरुण होते आणि तो देखील. अर्थात त्याला आधीचा अनुभव होता, म्हणजे माझ्या पेक्षा तो मोठा होता. दोघेही अल्लड वयात असल्यामुळे म्हणा का, सळसळत रक्त म्हणा, ध्येय गाठण्याची जिद्द, कामाचा डोंगर, विसावा हा माझ्या  शब्दकोशात नसलेला शब्द आणि असंख्य अशी कारणं देता येतील. त्यामुळे तो कधी अवतारायचा हे मला आणि माझ्या आजूबाजूच्यांना कधी म्हणजे कधीच समजलं नाहीच. ना हि चेहेऱ्या वर कधी काही उमटलं, नाही चाल बदलली नाही अजून काही, अगदी नेहेमीचा दिवस जसा. अहो बाहेरच्यांना कशाला घरच्यांना आणि मला स्वतःला देखील कधी म्हणजे कधीच समजलं नाही त्याच आगमन आणि गमन कधी होत असे ते. पण आता त्याचं वय झालंय, त्याच्या वाढत्या वयानुसार तो फार अजीब वागायला लागलाय आणि त्यामुळे तो मला समजावून सांगण्याचा अथक प्रयत्न करतोय कि आता विसावा घ्या, थोडी गती कमी करा, ई. त्याचं वाढलेलं वय आता झळकायला लागलंय माझ्या न कळत.   

तो आला तेव्हा जो उत्साहाचा झरा घेऊन आला होता आणि तो टिकला अनेक वर्ष / शतकं, त्यामुळे शंका पण शिवली नाही मनाला, असं वाटलं कि असंच असतं, नेहेमीच, त्यात बदल होतो हे माहित नव्हतंच आणि तो देखील इतका. अजूनही स्पष्ट आठवतं मला त्याच आगमन, ते सगळे बदल, आकार उकारात, विचार आणि आचारात, स्वप्नात आणि प्रत्यक्षात, अहाहा. 

तो तरुण होता तेव्हा सळसळती गती होती, त्यामुळे तो हि आणि मी हि मोकळी होत असे झटपट, आता बिच्चारा थांबत / अडखळत चालतो हो, म्हातारपण फार अवघड, त्याला आणि त्यामुळे मला पण. आता अगदी अडनेड्या तरुण वयापासून त्याला जपलं, त्याच्या म्हातारपणी सोडणं बरोबर नाही ना, आणि सोडणे हा पर्याय पण नाही हो. त्यामुळे त्या म्हाताऱ्याला ओंजारात गोंजारत पुढे चालणं आवश्यक आहे. बिच्चारा. असो, सगळेच टप्पे जगायचे, बिनधास्त, नेहेमीच, बदलेल्या चालींसगट गाडी चालवतांना जसे गियर बदलतो अगदी तस्से.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...