माझ्या सगळ्याच मैत्रिणी अतिशय भन्नाट आहेत, पण एवढ्यातच माझी एक माझ्या जुन्याच मैत्रिणीशी नव्याने ओळख झाली. मंडळी आश्चर्य वाटण्यासारखंच आहे सगळं. ती माझ्या पेक्षा वयाने, मानाने आणि अनुभवाने मोठी, पण तरी देखील आमची फारच मस्त मैत्री आहे. तिची एक खास खासियत म्हणजे तिची भेट झाली कि थोड्या थोड्या वेळाने श्वास सुरु आहे कि नाही हे तपासायचं, बास. तिच्या कडे भंडार / खजिना असतो गोष्टींचा, अनुभवांचा, किस्स्यांचा अहाहा, तो इतका मोठा आहे, म्हणजे त्याचा आवाका एवढा मोठा आहे कि प्रत्येक भेटीत ती नव्याने समजते / उमगते मला.
परवा म्हणते कशी, आम्ही काही जणी एकेकट्या किंवा ज्यांना जसं जमेल तश्या विविध जागी राहायला जातो, कधी एक दिवस, कधी आठवडा, तर कधी जास्त. पुण्यात आणि पुण्याजवळ असे बरेचसे केंद्र आहेत जेथे तुम्ही बदल म्हणून राहायला जाऊ शकता, कुठे आयुर्वेदिक उपचारासाठी जाऊन राहू शकता, तर कुठे शरीर शुद्धी / डिटॉक्स, मालिश, योग ई. साठी पण जातात. आधी निवृत्ती ५८-६०-६५ अश्या वयात होत असे, आता ते काहींच्या बाबतीत वयोमर्यादा कमी होतांना दिसते आहे. मग जर लवकर निवृत्ती घेतली आहे, किंवा जरी ऑफिस चालू आहे तरी देखील प्रत्येक वेळी घरीच परत जायला पाहिजे असं थोडी आहे, अश्या ठिकाणी जाऊन बरं व्हायचं असेल तर? काय हरकत आहे? मला तर काही अजिब वाटत नाहीच ह्यात. उत्कृष्ट बदल ठरेल, शारीरिक मानसिक आराम होईल तो वेगळाच, नवीन ओळखी होतील, शांतता लाभेल आणि नवतरुण चैतन्याने भरपूर अशी व्यक्ती तो ठराविक कोर्से झाला, बरं वाटलं कि परत येईल. काय भन्नाट कल्पना आहे, मला तर फार म्हणजे फारच आवडली. मला पण आवडेल असं काही अनुभवायला निश्चितच आणि लवकरच.
शनिवार, १२ मार्च, २०२२
निवृत्ती
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा