मंगळवार, १५ मार्च, २०२२

मोबाईल कव्हर

जेव्हा पासून ह्या नवीन अवयवाचा सुळसुळाट वाढला आणि माणसं माणसांपेक्षा ह्या वस्तूला गरजेपेक्षा जास्त महत्व देऊ लागले तेव्हा त्या मोबाईल बद्दलची उत्सुकता आणि निरीक्षण करणे आपोआप वाढले. एक प्रकर्षाने केलेले किंवा जाणवलेले निरीक्षण असे कि काही जणांचा मोबाईल हा कव्हर शिवाय असतो, म्हणजे तो व्यक्ती नुसताच मोबाईल वापरतो, काही जण फक्त पाठीमागचा बेस लावतात आणि बाकीचे पुढे देखील कव्हर करतात. सध्याच्या काळात प्रत्येक जणांचा मेल आणि इतर सगळे ऍप सिंक असतात मोबाईल वर आणि सातत्याने नोटिफिकेशन्स येतंच राहतात. अनेकदा मोबाईल चालू स्थितीत राहिला किंबहुना राहतोच तर सहज दुसऱ्याच्या मोबाईल वर काही वाजलं, हाललं किंवा दिसलं तर पुढच्याच, जवळ बसलेल्याचं लक्ष केंद्रित होतंच नकळत. हा माणसाचा स्वभाव / गुणधर्म जगजाहीर आहे कि दुसऱ्या सोबत काय होतंय हे बघणं, त्याबद्दल उत्सुकता ठेवणं, ई. हि झाली नाण्याची एक बाजू. दुसरी अशी आहे कि काही जणांना दुसऱ्यांनी त्यांच्या मोबाईल वर काय चाललंय हे बघितलं तर फरक पडत नाही, काही जण ठराविक गोष्टी दाखवतात आणि बाकी कधीच काहीच नाही, अगदी टॉप सिक्रेट, सगळं लपून-छपून / झाकलेलं. आणि अगदी अश्याच तीन पठडीतल्या स्वभावाच्या माणसांसाठी तीन तर्हेने मोबाईल हाताळले जातात, एक बिना कव्हर, एक खालचा भाग कव्हर आणि सरते शेवटी लपाछपी नेहेमीच. 

असो, अशी वैचारिकता आहे म्हणून तर मला निरीक्षण करता आलं आणि ह्या चार ओळी लिहिता आल्या. अपवाद सर्वत्र आहेतच, इथेही आढळतील, पण फार कमी. 

बरं आहे एका दृष्टीने हि अशी सगळं कव्हर करणारी मंडळी आहेत आजूबाजूला कारण त्यामुळे सेकंडरी स्क्रीन टाईम कमी होतो ना लोकांचा, दिसतंच नाही काय आणि कोणाचं वाजलं ते. आणि हो त्या मंडळींनी कदाचित फक्त असेही कव्हर उपलब्ध आहे म्हणून घेतले असेल सहज किंवा महागडी / नाजूक स्क्रीन / काच टिकवण्यासाठी. वर नमूद केलेला फक्त माझा दृष्टिकोन. अश्या छोट्या गोष्टी अनेकदा त्या व्यक्ती बद्दल बरेच काही सांगून जातात. हो, फक्त मोबाईल कव्हर बघूनच नाही, तर कपडे, बसणं, बोलणं, जोडे आणि एकंदरीत यादी भली मोठी आहे, "व्यक्ती तितक्या प्रकृती". प्रत्येकाकडून फक्त चांगलं वेचा आणि वेचत राहा अखंड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...