मंगळवार, १५ मार्च, २०२२

सेकंडरी स्मोक

आपण सर्वांनी अनेकदा हे ऐकलं, वाचलं आणि अनुभवलं असेलच कि सिगारेट ओढणं फार धोकादायक आहे प्रकृतीला. आता हि प्रकृती म्हणजे त्या माणसाची, समाजाची आणि निसर्गाची देखील. कोणी त्या कडे लक्ष देतं, नाही देतं, चाललंय सगळं तसंच. ह्या सोबत आपण सर्वांनी हे देखील ऐकलं, वाचलं आणि अनुभवलं असेलच कि सिगारेट चा धूर फुफ्फुसात गेला कि हानीकार ठरतो लहान मुलांना, जेष्ठ नागरिकांनां, गर्भवती महिलांना आणि इतरांना ज्यांना काही आजार आहेत. माझे वडील आणि बाकी वडिलधारी माणसं नेहेमीच सातत्याने सांगतात कि आपला जर कोणाला उपयोग होत नसेल तर दुरुपयोग / उपद्रव तरी नको व्हायला. बरोबर?

आता ह्या सेकंडरी स्मोक इतकाच अजून एक शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि इतर सगळ्या दृष्टीने भयावह असा धोका मला सातत्याने जाणवतो आहे आणि तो फैलतो देखील आहे. आणि तो म्हणजे "सेकंडरी स्क्रीन" चा धोका. आपण जेव्हा आपली स्क्रीन वापरण्यास सुरवात करतो तेव्हा त्याचा फॉन्ट, रंग, तेज, वर-खाली हलवण्याची गती ई. आपण ठरवतो, जे आपल्याला सोयीचं आहे तस्स. पण दुसऱ्याची गती, रंगसंगती, फॉन्ट ई. आणि बरेच काही त्यांना जरी सोयीचं असलं तरी दुसऱ्याला प्रचंड धोकादायक ठरू शकतं. आणि दुरून बघत असल्यामुळे अजून ताण पडतो डोळ्यांवर. मग का बघा त्या कडे? दुर्लक्ष का नाही करता येत? आपल्याला आपल्या स्क्रीन्स कमी पडल्यात कि काय म्हणून दुसऱ्याच्या बघतो? काय मिळतं बघून? टाळता येऊ शकतं का? आणि उत्तर आहे, सहज. प्रयत्नांती परमेश्वर. आपल्या कामाशी काम ठेवा, दाखवली आणि गरज असेल तर दुसऱ्याच्या स्क्रीन कडे बघा नाहीतर प्रयत्न पूर्वक टाळा, हे तुमच्या एकंदरीत स्वास्थ्याकरता अत्यावश्यक आहे. त्यामुळे शुभष्य शीघ्रम, आताच सुरवात करा आणि परमानंद, शांतता, सुख आणि बाकी कधी अनुभवलं ते अनुभवा मंडळी. सेकंडरी स्मोक तर फक्त कदाचित शारीरिक नुकसान करेल, सेकंडरी स्क्रीन ची सवय अनेक पातळीवर धोका निर्माण करते आणि वाईट परिणाम देते. आपल्या विविध स्क्रीन वर प्रेम करा आणि बाकी वेळ झाडं / फुलं / पानं / पशु / पक्षी / माणसं ई. वर, "व्हेन यू ह्याव इनफ ऑफ स्क्रीन लुक ऍट ग्रीन". ठरलं तर मग, "अश्या स्क्रीन्स येति आणि स्मृती ठेवुनी जाती". 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...