अगदी नेहेमी ऐकू येणार वाक्य घराच्या आणि दारच्यांकडून म्हणजे "आमच्या वेळी किंवा आमच्या जमान्यात....". लहान असतांना हे वाक्य कधी येणार हे देखील ठाऊक होतं आणि अर्थात हसू येत होतं, कधी कधी "अरे देवा, झाले का हे सुरु आता" असं काहीसं पण वाटत असे.
माझं लहानपण, शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण पण नागपुरात झालं. नागपूर म्हणजे त्यावेळी प्रचंड उन्हाळा. त्यात हमखास वीज जायची आणि मग नुसती हाय हाय. पण नारळपाणी, लिंबू पाणी, सरबतं, पन्ह, टरबूज, खरबूज आणि असे बरेच साथीदार दिमतीला असल्यामुळे जमून जायचं. जरी बाहेर प्रचंड गर्मी असली तरी आत शांताता टिकून राहायची. फारश्या ओल्या करून लोळ, तर ओले सुती कमचे अंगावर घेऊन लोळ, आणि ऊनं उतरल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही हा कटाक्ष ई. मुळे जमलं तेव्हा सहज सगळं. आणि तक्रार करणं एक तर स्वभावात नव्हतंच, कधी शिरलंच नाही आणि करून काही फायदा होणारच नव्हता तसा देखील, काय आहे त्यात प्रचंड समाधान मानायचं हेच माहिती होतं. सर्वत्रच आजूबाजूला सारखंच सगळं, मग काय मज्जा, धम्माल, आणि वेगळं करायला मिळतंय, प्यायला मिळतंय ह्याच कौतुक, लई भारी. असंख्य मित्र परिवार, घरी भरपूर दंगा, खाण्याची रेलचेल मग अजून काय हवं नाही का? इन्व्हर्टर म्हणजे विद्युत ऊर्जेचे परिवर्तक थोडेच होते घरोघरी. ह्या परिवर्तकामुळेच तर वीज गेली कधी आली कधी ह्या कानाचे त्या कानाला कळत नाही हो आताशा. सोय प्रचंड झाली आहे. पण विशेषतः अंधार पडल्यावर वीज गेली आणि खूप प्रतीक्षेनंतर आल्यावर एका सुरात सगळ्या घरातून जो आवाज यायचा, टाळ्या काय आणि परमानंद काय अहाहा, वाखाणण्या आणि सांगण्या पलीकडेच होतं आमच्या वेळी. नवीन पिढीने हे सगळं काय काठीने धक्का दिल्याशिवाय न सुरु होणारा पंखा, संगीतमय पंखा, पाच वर केला तरी एक पेक्षा कमी गतीने फिरणारा, एक पंखा आणि अनेक जण असे अनेक किस्से कुठे अनुभवले आहेत, त्यात देखील एक वेगळी शान होती मंडळी. असो. दोष अजिबात देत नाही मी, पण सध्याच्या चिरतरुण मंडळींचं गणितंच वेगळं आहे. अगदी वर्गात काय घरात आल्या आल्या पूर्ण स्पीड ने पंखा आणि तो सतत डोक्यावर चालूच. इतका कान पिळायचा त्या रेग्युलेटर चा, कि ज्याचं नाव ते. एवढा गरगरता पंखा असून देखील हे थंड, उत्साही, शांत असतात का? तर माहित नाही, बहुतांशी नाहीच.
सध्या आमच्या जुन्या घराला नवीन साज चढवला आहे, कचेरीत ३-४ माजले नवीन बांधले गेले आहेत आणि त्यात ८ च्या स्पीड चा रेग्युलेटर घरी मी पाहिल्यावर अवाक झाले. ८ ची स्पीड असते?, आणि का लागते? हेच माझ्या समजण्याच्या पलिकडचं आहे. त्या पेक्षा ताक आणि बाकी पेय नियमित प्यायलात, मानसिक शांतता टिकवण्याचा प्रयत्न केलात, योग केलात तर आजही सहज सोप्प आहे सगळं हो.
मी विद्यार्थिनी असतांना ची एक गोष्ट, माझ्या कॉलेज मधे वार्षिक परीक्षा सुरु होती, काळजी म्हणून सगळ्यात वरच्या मजल्यावर आमची खोली अक्का परीक्षा कक्ष होता, वीज गेली, आणि मी पुटपुटले पेपर लिहिता लिहिता, "काय प्रचंड गर्मी होते आहे", शिक्षक : "परीक्षा द्यायला आलात का पंख्याची हवा खायला ठरवा एकदा". बास, माझी बोलती बंद.
आणि आता, असं शिक्षक मुलांना / विद्यार्थ्यांना म्हणू पण शकत नाही, आणि म्हणू नये पण. असो. तेव्हा आणि आता मधे झालेले बदल येथे द्यायचा पर्यंत केला मी. जसे कि मला पंख फुटले आहेत आणि मी आत्ता ह्या क्षणी त्या परीक्षा कक्षात जाऊन आले असा भास झाला हे लिहितांना मला. न पंखा - टेबल फॅन - भिंतीवरचा फॅन - वैशिट्यपूर्ण असे विविध सिलिंग पंखे - ५ चा स्पीड - ८ चा स्पीड हा भला मोठा पल्ला गाठला आहे, मजेत. माझ्या सारखी भाग्यवान मीच.
गुरुवार, १० मार्च, २०२२
तेव्हा आणि आता
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा